Vijay Devarkonda esakal
मनोरंजन

Vijay Devarkonda : 'आईला नातू हवाय, पण....!' लग्नावर विजय देवरकोंडानं दिलेली प्रतिक्रिया चर्चेत

नॅशनल क्रश रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्यातील नात्याची नेहमीच वेगवेगळ्या प्रकारे चर्चा होताना दिसते.

युगंधर ताजणे

Vijay Devarkonda tollywood actor share wedding news : प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा हा आता वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये विजयचा चाहतावर्ग मोठा आहे. त्याचा चाहतावर्ग मोठा आहे. सोशल मीडियावर त्याची क्रेझही मोठी आहे. अशातच विजयच्या एका प्रतिक्रियेनं चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

नॅशनल क्रश रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्यातील नात्याची नेहमीच वेगवेगळ्या प्रकारे चर्चा होताना दिसते. सोशल मीडियावर त्याविषयी नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया भन्नाट आहेत. अशातच विजय देवरकोंडानं दिलेली प्रतिक्रिया मात्र खूपच वेगळी आहे. विजयच्या आईनं त्याला लग्नाविषयी केलेली विचारणा त्यावर विजयनं दिलेली प्रतिक्रिया चाहत्यांसाठी धक्कादायक मानली जात आहे.

Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

विजयनं काही दिवसांपूर्वी त्याच्या लग्नाविषयी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचं म्हणणं आहे की, घरातली लोकं मला लग्नासाठी दबाव आणत आहे. त्यांचे म्हणणे आहे की, मी लवकर लग्न करुन मोकळं व्हावं. त्यामुळे ते वेगवेगळ्या प्रकारे ती गोष्ट माझ्या मनावर दबाव आणताना दिसत आहे. त्यांना नातू हवा आहे. मला तर तसे सांगत आता लवकरात लवकर लग्न कर असे सांगण्यात आले आहे.

Vijay Devarkonda Tollywood actor share wedding news

विजयचा पुढील महिन्यात खुशी नावाचा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्या प्रमोशनच्या निमित्तानं तो एका शो मध्ये गेला होता. त्यावेळी त्यांन वेगवेगळ्या प्रश्नांना दिलेलं उत्तर चर्चेत आलं आहे. विजयची ती गोष्ट ऐकून राधा विजयच्या नावाच्या अभिनेत्रीनं दिलेली प्रतिक्रियाही नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. मात्र त्यावर विजयनं थेटपणे लग्न विषयावर केलेले भाष्य खूप काही सांगून जाणारे आहे.

Vijay Devarkonda Tollywood actor share wedding news

विजयनं आपल्याला लग्न करण्यात काहीही रस नाही. असे म्हटले आहे. मीच घरच्यांना गंमतीत म्हणतो की, तुम्हाला एवढं वाटतं तर तुम्हीच दुसरे लग्न करा..ते मला खूप समजून घेतात हीच मोठी गोष्ट आहे. त्यासाठी मी त्यांना खूप सारे धन्यवाद देतो. अशा शब्दांत विजयनं त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT