Vijay Deverakonda ananya pandey liger song aafat trolled using rape scene dialogue in lyrics Google
मनोरंजन

'Boycott Liger' मागणीनं धरला जोर; सिनेमातील 'आफत' गाणं लोकांना खटकलं म्हणे..

साउथ स्टार विजय देवरकोंडा आणि अनन्या पांड्येचा 'लाइगर' सिनेमा येत्या २५ ऑगस्ट रोजी रिलीज होत आहे.

प्रणाली मोरे

Boycott Liger: साउथ स्टार विजय देवरकोंडाच्या(Vijay Deverakonda) 'लाइगर' सिनेमाची सगळेच चाहते मनापासून वाट पाहत आहेत. पण त्यासाठी २५ ऑगस्ट पर्यंत थोडं थांबावं लागणार आहे. पण यादरम्यान आता बातमी कानावर पडतेय की 'लाइगर' सिनेमावर मोठं संकट कोसळलं आहे. विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडेचा 'लाइगर' सिनेमा पूरता फसला आहे. या सिनेमातील 'आफत' गाण्यानं सिनेमावर हे संकट ओढवलं आहे. चला कसं ते जाणून घेऊया.(Vijay Deverakonda ananya pandey liger song aafat trolled using rape scene dialogue in lyrics)

लाइगरचं गाणं 'आफत' सध्या सोशल मीडियावर ट्रेन्ड होत आहे. जो-तो या गाण्यावर रील बनवत सुटला आहे. गाण्यात विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडेचा धमाकेदार डान्स आणि त्यांची कमाल केमिस्ट्री सगळ्यांचे मन जिंकून घेत आहे. पण..या गाण्यानेच मोठा वादही ओढवून घेतला आहे. जर तुम्ही हे गाणं ऐकलं असेल नीट तर या गाण्याच्या मध्येच संवाद ऐकायला येतात. ते असे की, 'भगवान के लिए छोड दो मुझे,छोड दो,छोड दो मुझे'. गाण्यातील हे डायलॉग अनन्या पांड्ये (ANanya pandey)बोलताना दिसत आहे. या गाण्यात ती विजय देवरकोंडाच्या तावडीतून स्वतःला सोडवण्यासाठी ते डायलॉग बोलताना दिसत आहे.

'भगवान के लिए छोड दो मुझे' हे डायलॉग सर्वसाधारणपणे आधीच्या सिनेमांमध्ये रेप सीन्स मध्ये ऐकायला मिळायचे. हे खूपच कॉमन डायलॉग आहेत,ज्यांना तुम्ही बऱ्याच सिनेमांत याआधी ऐकलं असेल. 'आफत' गाण्यात हे रेप डायलॉग सामिल केल्यानं नेटकरी मात्र भडकले आहेत. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी गाण्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एका नेटकऱ्यानं म्हटलं आहे की,'हे गाणं प्रत्येक अॅडल्ट सिनेमात ओपनिंगला असायला हवं'. लोकांनी गाण्याच्या शब्दांना ऐकल्यानंतर आजच्या तरुणाईवर या गाण्याचे वाईट परिणाम होतील अशा भावना देखील व्यक्त केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे- 'मी स्पीचलेस आहे. बॉलीवूडनं लोकांना नाराज करण्याचा जणू वीडाच उचलला आहे. प्रत्येक गाण्यात मुलींना प्रॉपर्टी समजून वापरलं जातं'.

लोकांचे म्हणणे आहे की गीतकारांची क्रिएटिव्हिटी संपली आहे. काही नेटकऱ्यांनी तर चक्क 'लाल सिंग','रक्षाबंधन' सिनेमांसारखे 'लाइगरला' देखील बॉयकॉट करण्याची मागणी केली आहे. एकानं लिहिलं आहे,'कसा त्यांनी विचार केला की एवढ्या मॉर्डन गाण्यात जुन्या काळातील रेप सीनचा डायलॉग टाकावा'. नेटकऱ्यांच्या मते,याला स्विकारलं जाणार नाही. आता हा वाद पेटतोय त्यानंतर सिनेमाच्या टीमची काय अवस्था होतेय हे येणारा काळ सांगेल. मेकर्स आता सिनेमातून हे गाणं हटवतात की नाही हे लवकरच कळेल.

'लाइगर' सिनेमाला ट्रेलर रिलीजनंतर खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. पण सिनेमातील 'आफत' गाण्याच्या रिलीजनंतर 'लाइगर'च्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. लाइगरची निर्मिती करण जोहरची आहे,तर पुरी जगन्नाथ या सिनेमाचा दिग्दर्शक आहे. 'लाइगर' हा पॅन इंडिया सिनेमा आहे. याला हिंदीसोबतच साऊथमध्येही प्रदर्शित केलं जाईल. सिनेमात इंटरनॅशनल बॉक्सर माइक टायसन देखील दिसेल. 'लाइगर' बॉक्सऑफिसवर कसा परफॉर्म करतो यावर आता सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे का.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: सूर्यकुमारने UAE चा फलंदाज आऊट असतानाही फलंदाजीला परत का बोलावलं? जाणून घ्या नेमकं प्रकरण

KP Sharma Oli reaction : नेपाळमध्ये 'GEN-Z'च्या हिंसक आंदोलनामुळे पंतप्रधानपद सोडावं लागलेल्या ओली यांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले...

उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा मोठा निर्णय! सबळ कारणाशिवाय पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर; आरोपीस ताबडतोब मुक्त करण्याचा आदेश

Asia Cup, IND vs UAE: ५ षटकार अन् ४ चौकार... भारताचा फक्त २७ चेंडूत विजय! युएईला दिला धोबीपछाड

Marathi Sahitya Sammelan : साताऱ्यातील संमेलनाला एक कोटी अतिरिक्त निधी, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा; बोधचिन्हाचे अनावरण

SCROLL FOR NEXT