Vijay Deverakonda Reaction on Rashmika Mandanna Video:  Esakal
मनोरंजन

Rashmika Mandanna Video: "हे कुणासोबतही..." रश्मिकाच्या 'डीपफेक' व्हिडिओवर विजय देवरकोंडाचा संताप!

Vijay Deverakonda Reaction on Rashmika Mandanna Video: रश्मिका मंदान्नाचा एक डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला होता

Vaishali Patil

Vijay Deverakonda Reaction on Rashmika Mandanna Video:

सध्या साउथ अभिनेत्री रश्मिका मंदान्ना ही एका व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. रश्मिका मंदान्नाचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला. ज्यात एका दुसऱ्या मुलीच्या चेहऱ्यावर रश्मिकाचा चेहरा लावून तो व्हायरल करण्यात आला होता.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक कलाकार आणि रश्मिकाचे चाहते तिच्या सपोर्टसाठी समोर आले. अमिताभ बच्चन पासून ते मृणाल ठाकुर पर्यंत अनेकांनी या प्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी केली.

आता या प्रकरणावर साउथ स्टार विजय देवरकोंडाने देखील रश्मिकाच्या व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. रश्मिका आणि विजयच्या रिलेशनशीपच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होत आहेत. अशातच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत विजयने या सर्व प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे.

विजय देवराकोंडाने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात रश्मिकाच्या डीपफेक व्हिडिओवर सरकारने कारवाई केल्याची आल्याची बातमी दिली आहे.

ही पोस्ट शेअर करताना विजयने लिहिले, "भविष्यासाठी हे खूप महत्त्वाचे पाऊल आहे. हे कोणाच्याही बाबतीत होऊ नये.

यासोबतच अशा घटना तात्काळ थांबवून गुन्हेगारांना शिक्षा व्हावी यासाठी सक्षम सायबर विंग बनवण्यात यावी." सध्या विजयची पोस्ट सोशल मिडियावर खुप चर्चेत आहे. त्याने रश्मिकासाठी पोस्ट केल्यानं नेटकरी त्याचे कौतुक करत आहेत.

विजय देवराकोंडा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तो अनेकदा फोटो आणि व्हिडिओ शेअर करतो. अनेक दिवसांपासून रश्मिका आणि विजय एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होत आहेत. दोघेही बऱ्याचदा एकत्र दिसले आहेत. त्याचे व्हिडिओदेखील व्हायरल होत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Update: LPG कनेक्शनबाबत सरकारची मोठी अपडेट! 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरवर काय निर्णय?

AI आणि रोबोट्समुळे नोकऱ्या धोक्यात! बिल गेट्स यांना चिंता; ‘ह्यूमन रिजर्व्ड’चा फॉर्म्युला सुचवला, आरक्षणाची मागणी

Pancreatic Cancer Breakthrough: कॅन्सर उपचारात महत्त्वाची बातमी! पॅनक्रियाटिक कॅन्सरविरोधात मोठं यश; नव्या औषधाला FDAची मंजुरी

शिवीगाळ करणाऱ्याला श्वेता तिवारीने शिकवला धडा; शोधून काढत लेखी माफीनामा घेतला

Numerology: गर्दीतही वेगळी ओळख! इतर लोकांपेक्षा वेगळा विचार का करतात 'या' मूलांकाचे लोक? ट्रेंड फॉलो करत नाहीत...

SCROLL FOR NEXT