Vijay Deverakonda's stylist reveals why actor wore chappals worth ₹199 at Liger trailer launch Google
मनोरंजन

Liger च्या ट्रेलर लॉंचला विजयच्या पायात १९९ रु.ची चप्पल, आता समोर आले कारण

साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडाचं 'लाइगर' सिनेमाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण होत आहे.

प्रणाली मोरे

गेल्या काही दिवसांत मनोरंजन इंडस्ट्रीतली सर्वात चर्चेची गोष्ट म्हणजे विजय देवरकोंडा(Vijay Deverakonda) आणि त्याची स्टाइल. खासकरुन जेव्हा तो लाइगरच्या(Liger) ट्रेलर लॉंचला(Trailer Launch) पायात चप्पल घालून पोहोचला तेव्हापासून तर फक्त त्याचीच चर्चा रंगलेली दिसत आहे. सोशल मीडियावर विजयच्या स्टायलिस्टनं यामागच्या कारणाचा खुलासा केला आहे. आणि त्यानं स्पष्ट केलं आहे की, का विजय या कार्यक्रमात फक्त १९९ रुपयाची चप्पल घालून गेला होता?(Vijay Deverakonda's stylist reveals why actor wore chappals worth ₹199 at Liger trailer launch)

जेव्हा लाइगर च्या ट्रेलर लॉंच इव्हेंटचे व्हिडीओे सोशल मीडियावर शेअर व्हायला लागले तेव्हा विजयला पाहून जो तो आश्चर्य व्यक्त करु लागला. या कार्यक्रमात करण जोहर आणि अनन्या पांडे अगदी टिप टॉप कपड्यात पोहोचले होते तर विजय देवरकोंडाला पाहून कोणाला विश्वासच बसेना. नॉर्मल टीशर्ट आणि पायात तर चक्क १९९ रुपयांची चप्पल. हे पाहून लोक थक्क झाले पण यावर काहीही न बोलता गप्प बसेल तो रणवीर सिंग कुठला. कार्यक्रमाचा स्पेशल गेस्ट असलेल्या रणवीर सिंगने विजयच्या स्टाइलवर कमेंट करत म्हटलं,''भाईची स्टाईल तरी बघा, कळत नाहीय की हे माझ्या सिनेमाच्या ट्रेलर लॉंचला आले आहेत की स्वतःच्या सिनेमाच्या ट्रेलर लॉंचला''. यावर एकच हशा पिकला.

विजय देवरकोंडाच्या स्टायलिस्टने आता एका मुलाखतीत यावर बोलताना स्पष्ट केलं आहे की, ''अशा लूकमध्ये ट्रेलर लॉंचला पोहोचण्यामागे एक कारण होतं. पहिल्यांदा विजयला देखील सुपर स्टायलिस्ट लूक देण्याचं ठरलं होतं पण ऐनवेळी विजयच्या सांगण्यावरच त्याचा लूक असा ठेवला गेला. विजयला वाटत होतं की लाइगर मध्ये त्याच्या भूमिकेचा जसा लूक आहे अगदी तसाच लूक ट्रेलर लॉंचच्या वेळी असायला हवा. त्याने स्वतःच चप्पल मागवली आणि ती घालून तो कार्यक्रमात ट्रेलर लॉंचला पोहोचला आणि त्याची ही शक्कल काम करुन गेली. कारण तेव्हापासून आतापर्यंत फक्त विजयच्या ट्रेलर लॉंचच्या लूकचीच चर्चा रंगली आहे''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गलतीसे मिस्टेक! उपसरपंच बाईंनी स्वत:विरोधात दिलं मत, निकाल लागल्यावर समजलं; तहसीलदारांसमोर घातला गोंधळ

"त्याने पॅन्टमध्ये हात टाकला आणि.." मराठी अभिनेत्रीने उघड केला तिच्याबरोबर घडलेला धक्कादायक प्रकार !

Marathi Ekikaran Samiti Protests : दादरच्या कबुतरखान्याविरोधात मराठी एकीकरण समिती आक्रमक...पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात

Viral Video : धक्कादायक ! महिलेने बेकरीतून आवडीने खरेदी केला करी पफ, उघडताच निघाला साप, पाहा व्हिडिओ

Latest Marathi News Updates Live: नागपूरमध्ये मनपाच्या धावत्या बसमध्ये शॉटसर्किटमुळे आग, प्रवासी सुखरूप

SCROLL FOR NEXT