Vijayadashami 2023 TMKOC Memes esakal
मनोरंजन

Dussehra 2023 : जेठालालनं घेतला रावणासोबत पंगा झाला दंगा! पुढे काय घडलं? व्हिडिओनं चर्चेला उधाण

घटना, गोष्ट अथवा प्रसंग कोणताही असो त्यावर मिश्किल टिप्पणी करण्यासाठी तारक मेहता का उल्टा चष्मामधील मीम्सचा उपयोग होतोच.

युगंधर ताजणे

Vijayadashami 2023 TMKOC Memes: टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा ही नेहमीच प्रेक्षकांच्या, चाहत्यांच्या चर्चेचा विषय राहिली आहे. या मालिकेनं गेल्या दोन दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. लहानांपासून ज्येष्ठांपर्यत सगळ्याच वयोगटातील व्यक्ती या मालिकेचे प्रेक्षक आहेत.

घटना, गोष्ट अथवा प्रसंग कोणताही असो त्यावर मिश्किल टिप्पणी करण्यासाठी तारक मेहता का उल्टा चष्मामधील मीम्सचा उपयोग होतोच. सोशल मीडियावर एखाद्या ट्रेडिंग गोष्टीवर जेव्हा कॉमेडी मीम्स व्हायरल होतात त्याच बहुतांशी मीम्स हे टीएमकेचे असल्याचे दिसून येतात. यावरुन या मालिकेची लोकप्रियता कळून येते. या मालिकेतील जेठालाल, दयाबेन यांचे मीम्स विशेष लोकप्रिय आहेत.

Navratri 2023 : तलवारीचं 'स्त्री'त्त्व आणि आदिमायेच्या गुणतत्त्वांचा सहसंबंध काय आहे?

आता विजयादशमीच्या निमित्तानं तारक मेहताच्या जेठालालचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये जेठालाल यांचा तो रावणाचा सीन नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. सोशल मीडियावर त्या व्हिडिओनं पुन्हा एकदा वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. त्या एपिसोडमध्ये जेठालाल हे रावणाशी पंगा घेताना दिसतो आहे. त्याचवेळी त्याची झालेली फजिती नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा विषय आहे.

त्या व्हिडिओमध्ये दिसून येते की, रावण येऊन जेठालालला जागं करतो. त्याचवेळी त्यानं रावणाची टिंगल करण्यास सुरुवात केली. जेठालाल त्याला विचारतो मी तुला रावण का म्हणू? रावणाकडे दहा तोंडं होती. तुझ्याकडे तर एकच आहे. तेव्हा रावण त्याला म्हणतो, माझ्यासोबत बाहेर चल मी तुला दाखवतो. या दोघांचा संवाद असाच सुरु राहतो. त्यांच्या या वाकयुद्धाला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. काहींनी त्यावर दिलेल्या प्रतिक्रियाही भन्नाट आहे.

या व्हिडिओवर युझर्सनं दिलेल्या प्रतिक्रियाही भलत्याच भन्नाट आहे. एकानं म्हटले आहे की, जेठालालचा स्वॅगच भारी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून टीएमकेओसी मालिकेनं आमचे खूपच मनोरंजन केले आहे. या मालिकेतील सर्वच कलाकारांना धन्यवाद जेवढे द्यावेत तेवढे कमीच आहे. अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT