vikram bhatt daughter krishna bhatt wedding attend aamir khan, sunny leone, bobby deol SAKAL
मनोरंजन

Vikram Bhatt ची मुलगी Krishna Bhatt चं झालं लग्न, बॉयफ्रेंडसोबत चढली बोहल्यावर

कृष्णा आणि वेदांत यांची डिसेंबर २०२२ मध्ये एंगेजमेंट झाली

Devendra Jadhav

Vikram Bhatt daughter krishna Bhatt Wedding News: दिग्दर्शक विक्रम भट्ट यांची मुलगी कृष्णा भट्टने तिचा प्रियकर वेदांतसोबत लग्न केले.

11 जून रोजी कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत त्यांनी सात फेऱ्या केल्या. जयमाला समारंभानंतर कृष्ण भट्ट आणि वेदांत एकत्र पोज देतात.

कृष्णा आणि वेदांत यांची डिसेंबर २०२२ मध्ये एंगेजमेंट झाली. गेल्या अनेक दिवसांपासून कृष्णाच्या लग्नाची चर्चा सुरू होती आणि आता अखेर ती आणि वेदांत एकमेकांचे झाले आहेत.

(vikram bhatt daughter krishna bhatt wedding attend aamir khan, sunny leone, bobby deol)

सोशल मीडियावर कृष्णा भट्टच्या लग्नाच्या फोटोंचा बोलबाला आहे. नववधू कृष्ण भट्ट आणि तिचा नवरा वेदांत सारडा यांची जोडी म्हणजे अगदी लक्ष्मी - नारायणाचा जोडा शोभतोय.

कृष्णा भट्टच्या लग्नाला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. कृष्णा भट्टच्या लग्नात आमिर खानही पोहोचला होता.

आमिर व्यतिरिक्त, सनी लिओनी, बॉबी देओल, कुणाल कपूर, पूजा भट्ट, संदीपा धर आणि अविका गोर या लग्नात सहभागी झालेल्या इतर सेलिब्रिटींचा समावेश होता.

कृष्णा भट्टच्या लग्नात सनी लिओनी पती आणि मुलांसह पोहोचली होती. तर पूजा भट्ट वडील महेश भट्ट आणि इतर कुटुंबीयांसह लग्नात पोहोचली होती.

कृष्णा आणि वेदांत यांच्या लग्नाच्या विधींचे काही व्हिडिओही समोर आले आहेत, ज्यांची चर्चा होत आहे.

कृष्णा भट्टने ETimes शी केलेल्या संभाषणात सांगितले होते की, त्यांनी जूनमध्ये लग्न करण्याची योजना आखली होती आणि ती योजना यशस्वी झाली. कृष्णाच्या आनंदाला उधाण आलंय कारण याच महिन्यात तिचा सिनेमा २३जूनला प्रदर्शित होतोय.

कृष्णाचा नवरा वेदांत शारदा हे WTFair नावाचे ट्रॅव्हल इंजिन चालवतात. कृष्णाने सांगितले होते की हे सर्वात वेगवान हॉलिडे प्लॅनिंग इंजिन आहे. वेदांतने 2014 मध्ये आपल्या भावासह या कंपनीची स्थापना केली होती.

या कंपनीअंतर्गत त्यांनी आणखी अनेक गोष्टी सुरू केल्या आहेत. आता मुलगी सासरी गेल्याने वडील विक्रम भट नक्कीच भावुक झाले असतील यात शंका नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT