Vikram KamaAnna thel Hassan Movie  esakal
मनोरंजन

Vikram : कमल हासननं केलं रजनीकांत यांचं रेकॉर्ड ब्रेक! पहिल्याच दिवशी मोठी कमाई

दोन आठवड्यापूर्वी कमल हासन यांच्या विक्रमचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. सोशल मीडियावर विक्रमच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. गेल्या

युगंधर ताजणे

Tollywood Movies: दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये ज्या अभिनेत्याला देवाचा दर्जा दिला जातो, ज्यांचा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्यांच्या पोस्टरला (Rajnikanth) दुधाचा अभिषेक घातला जातो त्या रजनीकांत यांच्या फॅन फॉलोअर्सची गोष्टच वेगळी आहे. केवळ भारतातच नाहीतर जगाच्या (bollywood movies) पाठीवर या अभिनेत्याचा चाहतावर्ग आहे. त्यांचा कुठलाही चित्रपट असो त्याला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळतो. मात्र या अभिनेत्याला टक्कर देणारा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर आला (box office) असून त्याचे नाव विक्रम असे आहे. काल हा चित्रपट प्रदर्शित झाला. प्रसिद्ध अभिनेते कमल हासन, विजय सेतूपति, फवाद यासारखी तगडी स्टारकास्ट असणाऱ्या या चित्रपटानं चक्क रजनीकांत यांचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. तो रेकॉर्ड काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

दोन आठवड्यापूर्वी कमल हासन यांच्या विक्रमचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. सोशल मीडियावर विक्रमच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत होते. कमल हासन यांचा विक्रम एका गाण्यामुळे वादाच्या भोवऱ्यातही सापडला होता. ते गाणे आणखी एका वेगळ्या भाषेतील गाण्यावर आधारित असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र त्या वादाचा कोणताही परिणाम विक्रमवर झाला नाही. याउलट त्याच्या प्रसिद्धीमध्ये आणखी वाढ झाली. सध्या विक्रम बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसतो आहे. मोठी स्टारकास्ट, जबरदस्त अॅक्शन, वेगवान कथानक, लक्षवेधी छायाचित्रण यामुळे विक्रमला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे.

विक्रमने पहिल्याच दिवशी विक्रमी कमाई केली आहे. या चित्रपटानं रजनीकांत यांचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. रजनीकांत यांच्याबरोबरच साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये कमल हासन यांचाही वेगळा प्रेक्षकवर्ग आहे. बॉलीवूडमध्येही कमल हासन यांना मानणारा मोठा प्रेक्षक आहे. त्यांची अभिनय शैली आजही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते. अशा कमल हासन यांचा हटक्या स्टाईलमधील विक्रमनं नवे विक्रम रचायला सुरुवात केली आहे. सध्या विक्रम सोबत अक्षय कुमारचा सम्राट पृथ्वीराज, आदिती शेष यांचा मेजरही प्रदर्शित झाला असून त्यालाही प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रजनीकांत यांच्या अन्नाथे नावाच्या चित्रपटाचा रेकॉर्ड विक्रमनं मोडला आहे. कमल हासन यांच्या विक्रमची केवळ तामिळनाडू पुरती गोष्ट करायची झाल्यास या चित्रपटानं त्या राज्यातून काल वीस ते तीस कोटींची कमाई केली आहे. त्यावरुन त्याच्या लोकप्रियतेचा अंदाज येईल. पहिल्याच दिवशी विक्रमनं 40 कोटींचे कलेक्शन केल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे येत्या दिवसांत विक्रम कमाईचे नवे शिखर गाठेल असा अंदाज बॉक्स ऑफिसच्या जाणकारांनी व्यक्त केला आहे. विक्रमच्या प्री बुकिंगची गोष्ट करायची झाल्यास तो आकडा दहा कोटींच्या आसपास आहे. ओटीटीवर देखील हा चित्रपट प्रभावी कामगिरी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya Ram Temple: अयोध्येत राम मंदिर परिसरात नमाज पठण करण्याचा प्रयत्न! विश्वस्त मंडळाकडून सुरक्षा व्यवस्थेत होणार मोठे बदल

विरोधात उभा रहायची हिंमत कशी केलीत? पिंपरीत भाजप कार्यकर्त्यांचा मध्यरात्री राडा, घरात घुसून शिवीगाळ

ताजमहालचे खास तळघर उघडणार! मोफत पाहण्याची एकमेव संधी; जाणून घ्या ३ दिवसांचे वेळापत्रक

Maharashtra Dry Day राज्यात २९ ठिकाणी ४ दिवस ड्राय डे, १३ ते १६ जानेवारीपर्यंत मद्यपानास मनाई

Latest Marathi News Live Update : इस्रोचे मिशन अयशस्वी, कक्षेत पोहोचण्यापूर्वीच 'अन्वेषा' अवकाशात गायब

SCROLL FOR NEXT