Vikram Vedha Teaser, Saif Ali Khan And Hrithik Roshan News esakal
मनोरंजन

Vikram Vedha Teaser : विक्रम वेधामध्ये व्हिलन बनला हृतिक, टिझर प्रदर्शित

'विक्रम वेधा'मध्ये व्हिलन बनला हृतिक रोशन

सकाळ डिजिटल टीम

Vikram Vedha Teaser News : वाईट आणि चांगल्यामध्ये फरक करणे सोपे आहे. मात्र येथे दोघेही वाईटच आहेत. २०२२ मधील बहुप्रतिक्षीत चित्रपट विक्रम वेधाची दमदारपणे टीझर प्रदर्शित झाला आहे. हे टीझर पाहिले म्हणजे काहीच पाहिले नाही.

२०१७ मध्ये आलेल्या सुपरहिट तामिळ चित्रपट विक्रम वेधात आर माधवन आणि विजय सेतुपथीच्या अभिनयाने प्रेक्षक थक्क झाले. आता पुन्हा एकदा चंदेरी पडद्यावर विक्रम आणि वेधा परत येतायत. मात्र नवीन अवतारात आणि स्वॅगमध्ये.

सैफ-हृतिकची धमाल

तामिळ चित्रपट विक्रम वेधाच्या हिंदी व्हर्जनमध्ये हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सैफअली खान (Saif Ali Khan) मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटातून हृतिक रोशन तीन वर्षानंतर चंदेरी पडद्यावर परतत आहे.

एक मिनिटांपेक्षा जास्त असलेल्या टीझर अंगावर शहारे आणते. सर्वोत्तम अॅक्शन, दमदार संवाद आणि थ्रिलर टीजरमध्ये पाहिला मिळतो. विक्रम वेधाच्या हिंदी व्हर्जनचे दिग्दर्शनही मूळ दिग्दर्शक पुष्कर-गायित्री यांनीच केले आहे.

टिझरमध्ये काय आहे?

या चित्रपटात हृतिक रोशन आणि सैफअली खानची पाॅवरपॅक्ड परफाॅर्मन्समध्ये दिसत आहेत. दुसरीकडे त्यांचा लूकही हटके आहे. हृतिक व्हिलन असून दुसरीकडे सैफ पोलिस अधिकारी आहे. चित्रपटाची पटकथा वाईट विरुद्ध चांगूलपणावर आधारित आहे. यात हृतिक चोर असून सैफ हा पोलिसाच्या भूमिकेत आहे. वेधा हृतिक असून सैफ हा विक्रम बनला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अश्लील व्हिडिओ बघत आहे म्हणून CBI ने पाठवला मेल; ओपन करताच दिसलं असं...नेमकी भानगड काय?

IND vs SA 4th T20I: हे काहीतरी वेगळंच! भारत-दक्षिण आफ्रिका सामना पावसामुळे नाही, तर 'या' गोष्टीमुळे उशीरा सुरू होणार

Railway News: आता तिकीट कन्फर्म होणार की नाही हे 10 तास आधीच समजणार; वेटिंग-RAC प्रवाशांना मोठा दिलासा

घरी उपाशी आहात की खिचडी खाताय हे... 'आई कुठे...' फेम कांचन आजींनी केली इंडस्ट्रीची पोलखोल; म्हणतात- मराठीत...

Latest Marathi News Live Update : भरचौकात तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार

SCROLL FOR NEXT