Vikrant Massey Emotional Incident esakal
मनोरंजन

Vikrant Massey : 'मित्र घरी आले जेवण केलं अन् आयुष्यातला सगळ्यात मोठा धडा शिकवून गेले'! विक्रांतचा डोळ्यात पाणी आणणारा अनुभव

विक्रांतनं (Vikrant Massey Latest News) त्याच्या मित्रांविषयी जे काही सांगितलं आहे ते गंभीरपणे विचार करायला लावणारं आहे.

युगंधर ताजणे

Vikrant Massey News: विधू विनोद चोप्रा यांचा गेल्या वर्षी १२ वी फेल नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यात आयपीएस अधिकारी मनोज (12th Fail Movie Latest News) कुमार शर्मा या अधिकाऱ्याची भूमिका विक्रांत मेस्सीनं साकारली होती. त्यानं त्या भूमिकेचं सोनं करत प्रेक्षकांना जिंकून घेतले होते.

यंदाच्या वर्षी फिल्मफेयर पुरस्कार सोहळ्यात विधू विनोद चोप्रा यांच्या १२ (12th Fail Won Film fare Awards 2024) वी फेलनं अनेक पुरस्कारांवर आपल्या नावाची मोहोर उमटविल्याचे दिसून आले आहे. या सगळ्यात विक्रांतचं बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी कौतुकही केलं. त्यात अभिनेत्री करिना कपूर, हृतिक रोशन यांच्या नावाचा समावेश आहे. याशिवाय बॉलीवूडमधील अनेक दिग्दर्शकांनी देखील १२ वी फेलची स्तुती केली आहे.

काही दिवसांपूर्वीच विक्रांतनं त्याची गोड बातमी शेयर करुन चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. त्यानंतर त्याच्या आणखी एका पोस्टनं (Vikrant Massey Latest News) नेटकऱ्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे. एखाद्या माणसाची जेव्हा वाईट वेळ असते तेव्हा लोकं त्याची कशा कशावरुन पारख करतात याचं उदाहरण विक्रांतनं आपल्या त्या पोस्टमधून सांगितलं आहे.

कोईमोईनं याबाबत एक रिपोर्ट दिला असून त्यातून विक्रांतची त्या घटनेच्या वेळची असणारी मानसिक स्थिती आणि त्यानं त्याचं केलेलं विश्लेषण याविषयी सांगितलं आहे. विक्रांत म्हणतो की, माझ्या मित्रांनी मला माझ्या घरी येऊन जेवण करुन शेवटी मलाच कशाप्रकारे अपमानित केलं होतं याविषयीची एक गोष्ट सांगतो.

मी एकदा माझ्या काही मित्रांना घरी बोलावलं, खरं तर ते माझे खूपच जवळे मित्र होते. मला आता त्यांच्याविषयी फारसं काही वाटत नाही. मी तुम्हाला लोकांची मानसिकता कशी असते याविषयी सांगतो. माझी आई खूप चांगला स्वयंपाक करते. म्हणून म्हटलं की, मित्रांना घरी बोलवावं. मित्र घरी आले आणि त्यांनी माझं घर पाहिलं. ते त्यांच्या स्वच्छतेच्या व्याख्येत बसणारं नव्हतं.

माझ्या घरात प्लॅस्टिकच्या खुर्च्या पाहिल्या. पंखा पाहिला त्यावरील धूळ पाहिली. तो स्वच्छ नव्हता. स्वयंपाक घर पाहिले ते त्यांना आवडले नसल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरुन दिसून आले. ते जेवले आणि म्हणाले की आम्हाला आता निघायला हवं. पण त्या घटनेनंतर त्यांचं माझ्यासोबतचं वागणं पूर्णपणे बदललं होतं. अशी आठवण विक्रांतनं त्याच्या मित्रांविषयी सांगितली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Voter Fraud: बापरे! एकाच घरात ४ हजार २७१ मतदार; अधिकाऱ्यांनी केले हात वर, म्हणाले...

Latest Maharashtra News Updates : बावधन पोलिस चौकीसमोरची परिस्थिती

Gold Investment : 'पितृपक्षात सोने खरेदी करू नये' हा गैरसमज मोडीत; सराफ व्यावसायिकांचे निरीक्षण

US tariff on India update: अमेरिका लवकरच मोठा निर्णय घेणार! भारतावरील अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ हटवणार?

Neeraj Chopra कडून घोर निराशा! जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक राखण्यात अपयशी, टॉप-६ मध्येही स्थान नाही

SCROLL FOR NEXT