Vikrant Massey confirms he is expecting first child with wife Sheetal Thakur  Esakal
मनोरंजन

Vikrant Massey: 'हो आम्ही...', मिर्झापूर फेम विक्रांतनं दिली चाहत्यांना गोड बातमी! पोस्ट व्हायरल

Vaishali Patil

Vikrant Massey And Sheetal Expecting Their First Child: लव्ह हॉस्टेल आणि हसीन दिलरुबा यांसारख्या चित्रपटांमध्ये आणि मिर्झापूर मधील बबलू पंडीतच्या भुमिकेने लोकप्रिय झालेला अभिनेता विक्रांत मॅसी हा गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होता.

त्याची पत्नी शीतल ठाकूर गर्भवती असून ती आई आणि विक्रांत मॅसी  लवकरच बाबा होणार अशा बातम्या समोर आल्या होत्या. मात्र या कपलनं याबाबत अधिकृत माहिती दिली नव्हती त्यामुळे चाहते थोडे साशंक होते. मात्र आता स्वत: विक्रांतने चाहत्यांना ही गोड बातमी दिली आहे.

पत्नी शीतल ठाकूरसोबतचा लग्नाचा फोटो शेयर त्यांनी एक पोस्ट शेयर केली आहे. ज्यात त्यांनी आयुष्याची नवी सुरुवात असं कॅप्शन दिलं आहे. सध्या त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोघांचे चाहते त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहे.

दोघेही ALTBalaji च्या वेब शो 'Broken But Beautiful' च्या सेटवर भेटले होते. दोघेही अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. 2015 पासून एकमेकांना डेटिंग केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या जोडप्याने फेब्रुवारी 2022 मध्ये लग्न केले.

विक्रांत आगामी चित्रपट 12वी फेल, सेक्टर 36 आणि त्यानंतर येतो हसीन दिलरुबा 2 या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. तर शीतलने 'अपस्टार्ट्स', 'ब्रिज मोहन अमर रहे' आणि 'छप्पर फड के' सारख्या अनेक चित्रपट आणि वेब शोमध्ये काम केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारत महान देश, माझा मित्र तिथं टॉपचा नेता; शरीफ यांच्यासमोर ट्रम्पकडून PM मोदींचं कौतुक

Weather Update : 'मॉन्सून'बाबत महत्त्वाची अपडेट! महाराष्ट्रातील बहुतांश भागांतून पावसाची माघार; हवामान विभागानं काय सांगितलं?

ICC Womens World Cup 2025 : स्पर्धेत राहण्यासाठी टीम इंडिया स्ट्रॅटेजी बदलणार? दोन पराभवानंतर हरमनप्रीत कौरला कठोर निर्णय घ्यावेच लागणार...

Latest Marathi News Live Update : पुणेकरांची दिवाळी यंदा धूमधडाक्यात! फटाक्यांची दुकानं राहणार २४ तास खुली

Solapur News: 'शेतकऱ्यांचा माजी गृहराज्यमंत्र्यांच्या दारात टाहो'; दोन वर्षांपासून पाच कोटींची रक्कम थकवली, साेलापुरात बेमुदत उपोषण

SCROLL FOR NEXT