Vikrant Messey And Shital Thakur  
मनोरंजन

Vikrant Sheetal Wedding: आपलीच हळद, म्हणून एवढं नाचायचं?

बॉलीवूड आणि टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये सध्या (Tv Entertainment) लग्नाचा सीझन सुरु झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Bollywood News: बॉलीवूड आणि टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये सध्या (Tv Entertainment) लग्नाचा सीझन सुरु झाला आहे. वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी आपल्या जीवाभावाच्या साथीदारासोबत सात फेरे घेतले आहेत. आवडत्या सेलिब्रेटींच्या लग्नाचे फोटो पाहणे, त्याला कमेंट करणे हा त्यांच्या चाहत्यांच्या आवडीचा विषय. गेल्या वर्षी विकी कौशल आणि कतरिनाच्या लग्नाच्या वेळी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. त्यांनी तर लग्नाच्या कोणत्याही कार्यक्रमाचे फोटो व्हायरल होणार नाहीत याची काळजी घेतली होती. आता प्रसिद्ध अभिनेता विक्रांत मेस्सी (Vikrant Messey) आणि त्याची गर्लफ्रेंड शितल (Shitral Thakur) यांच्या हळदीचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. नेटकऱ्यांनी त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंटसही केल्या आहेत.

विक्रांत मेस्सी आणि शितल ठाकूर हे आता विवाहबंधनात अडकणार आहेत. चाहत्यांना गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाचे वेध लागले होते. वास्तविक या दोन्ही सेलिब्रेटींनी नोंदणी विवाह केला आहे. आता पारंपारिक पद्धतीनं ते विवाहबद्ध होणार आहे. त्याची त्यांच्या सर्व चाहत्यांना कमालीची उत्सुकता लागली आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या हळदी सेरेमनीचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. हे दोघेही आजच विवाहबंधनात अडकणार असल्याचे सांगितले जात आहे. हळदी सेरेमनीमध्ये विक्रांत मेस्सी आणि शितलनं केलेला डान्स कमालीचा लोकप्रिय झाला आहे. त्यावर नेटकऱ्यांनी त्यांना भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एकानं तर आपल्याच हळदीच्या कार्यक्रमामध्ये एवढं कुणी नाचतं का असा प्रश्न विचारला आहे.

हे दोन्ही सेलिब्रेटी प्रियंका चोप्राच्या माय देसी गर्ल नावाच्या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. त्यांनी एकमेकांच्या चेहऱ्याला हळद लावली आहे. त्यांच्या समवेत नातेवाईक, कुटूंबीय आणि मित्र मंडळीही नाचण्यात दंग झाली आहेत. यावेळी विक्रांत आणि शितलचा उत्साह तर दाद देण्यासारखा आहे. त्यांनी केलेल्या डान्सला उपस्थितांची वाहवा मिळाली आहे. विक्रांत आणि शितलनं त्यांच्या लग्नाची गोष्ट ही जाणीवपूर्वक मीडियापासून लांब ठेवली होती. एवढचं नाही तर त्यांच्या प्री वेडिंगचे फोटोही फार उशिरानं सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: ''कितीही दबाव आला तरी आम्ही सहन करू'', 'ट्रम्प टॅरिफ'वरुन मोदी स्पष्ट बोलले

AI Use in Ganeshotsav Crowd गणेशोत्‍सवातील गर्दीच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी ‘एआय’चा वापर

ED Action: धर्मांतर टोळीचा मास्टरमाइंड चांगूर बाबाला 'मनी लाँड्रिंग' प्रकरणात ‘ED’चा दणका!

सरकारचा आदेश निघाला! ५२ हजार २७६ शिक्षकांसाठी मोठा निर्णय, अशंत: अनुदानावरील शाळांना २० टक्के वाढीव टप्पा अनुदान मंजूर, १ ऑगस्टपासून मिळणार अनुदान

Latest Marathi News Updates: निफाड साखर कारखान्याला पिंपळस ग्रामपालिकेडून सील

SCROLL FOR NEXT