Vikrant Massey 12th Fail Top In The List Of Imdb Rating  Esakal
मनोरंजन

12th Fail: आणखी एक 'विक्रांत भरारी'! '12th फेल' IMDb वर ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट! मिळालं इतकं रेटींग

विधू विनोद चोप्राचा '12वा फेल' हा 2023 चा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. IMDb ने विक्रांत मॅसी स्टारर चित्रपटाला 9.2 रेटिंग दिले आहे.

Vaishali Patil

Vikrant Massey 12th Fail Top In The List Of Imdb Rating: विधू विनोद चोप्रा आणि अभिनेता विक्रांत मॅसी सध्या '12वी फेल' ला मिळणारे प्रेम आणि यश साजरा करत आहे. कमी बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे.

आता विक्रांत मॅसीच्या 12वी फेलने 'ओपनहायमर' आणि 'बार्बी'ला मागे टाकून IMDb मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. विक्रांत मॅसी आणि मेधा शंकर यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट आताही प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. चित्रपटगृहानंतर आता हा सिनेमा ओटीटीवर धुमाकूळ घालत आहे.

प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केल्यानंतर आता '12वी फेल'ने पुन्हा एक विक्रम आपल्या नावे केला आहे. या चित्रपटाला आता IMDbने 10 पैकी 9.2 रेटिंग दिले आहे.

या रेटिंगसह '12वी फेल' आता या वर्षातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत टॉपवर आहे. या सिनेमाने केवळ भारतातच नाही तर जगभरातील चित्रपटांच्या यादित पहिलं स्थान मिळालं आहे.

भारतीय चित्रपटांच्या 250 चित्रपटांच्या यादीपैकी '12 वी फेल' हा IMDb वर सर्वाधिक रेट केलेला सिनेमा म्हणून ओळखला गेला आहे.

IMDb च्या सर्वेक्षणानुसार, 2023 मधील त्या चित्रपटांना टॉप लिस्टमध्ये ठेवण्यात आले होते ज्यांना किमान 20,000 युजरची मतं मिळाली आहेत. '12वी फेल' हा सर्वाधिक मतांसह सर्वाधिक रेटिंग असलेला चित्रपट ठरला आहे.

तर 'स्पायडर-मॅन: अॅक्रॉस द स्पायडर-व्हर्स' या सिनेमाला 8.6 रेटिंग मिळाले तर जास्त चर्चेत राहिलेल्या 'ओपनहायमर' 8.4 रेटिंग मिळाले आहे. तर या यादीत चौथ्या स्थानावर 'गॉडझिला मायनस वन' सिनेमा आहे त्याला 8.4 रेटिंग मिळाले आहे. तर कन्नड चित्रपट 'कायवा' 8.2 रेटिंगसह टॉप 5 मध्ये सामील झाला आहे.

'12वी फेल'ने 70 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटात विक्रांत मॅसीसोबत मेधा शंकर, संजय बिश्नोई, अंशुमन पुष्कर यांनी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित हा चित्रपट आता हिंदी, तमिळ आणि तेलुगू चित्रपटगृहांमध्ये पाहता येणार आहे. तसेच हा चित्रपट हॉटस्टारवर देखील उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : मानाचा चौथा तुळशीबाग गणपती बेलबाग चौकात दाखल, पाहा थेट प्रक्षेपण

Pune Metro : गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रोचा मोठा निर्णय; रात्री 11 वाजेपर्यंत सलग 41 तास धावणार मेट्रो, प्रवाशांना दिलासा

Latest Maharashtra News Updates : मुंबई स्फोटकांनी उडवून देण्याच्या थ्रेडनंतर मुंबई पोलिस सतर्क

10,000 कोटींच्या मालकाची बायको, परंतु अभिनेत्री राहिली गटारीशेजारच्या झोपडीत, कारण ऐकून थक्क व्हाल

Chandra Grahan 2025: पितृपक्षाच्या पहिल्याच दिवशी लागणार चंद्रग्रहण, एक दिवस आधीच करा तुळशीशी संबंधित 'ही' कामे

SCROLL FOR NEXT