village girl dance on mother India song ghunghat song viral on internet  
मनोरंजन

Video Viral; मदर इंडियाच्या गाण्यावर उसाच्या फडात डान्स, माधुरीकडून वाहवा 

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - सोशल मीडियावर एका मुलीचा डान्स कमालीचा लोकप्रिय झाला आहे. त्यात ती मुलगी मदर इंडियाच्या गाण्यावर डान्स करताना दिसत असून तो व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या चित्रपटातील घुंघट नही खोलुंगी सैया तोरे आगे या गाण्यावर केलेला डान्स नेटक-यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. तो डान्स पाहून बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरीनं तिचं कौतूक केलं आहे. या गाण्याला रागगिरीनं आपल्या ट्विटर हँडलवरुन शेयर केले आहे.

ज्यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे त्यांनी आपल्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, डान्स करण्यासाठी कुठल्या पंखांची गरज नाही. मनात हवी इच्छाशक्ती. जेव्हा हा व्हिडिओ आपण पाहतो तेव्हा त्याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. इतका सुंदर नाच त्या मुलीनं केला आहे. त्याला अभिनेत्री माधुरी दीक्षितनं कमेंट केली आहे. मुलीचं कौतूक करताना लिहिले आहे की, एकदम सुंदर, अप्रतिम डान्स केला आहे. त्या मुलीनं खूप सुंदरतेनं डान्स केला आहे. तिच्यात खूप टँलेट आहे. ज्याला आता बाहेर काढण्याची गरज आहे.

उसाच्या शेतात मुलीचा डान्स पाहून तिच्यावर कौतूकाचा वर्षाव होताना दिसत आहे. ती मुलगी गावाकडील असून शेताच्या मधोमध उभे राहून ती डान्स करत आहे. तिच्या अवती भोवती काही महिला दिसत असून त्या तिच्याकडे कौतूकानं पाहत आहेत.इतर काही महिला काम करता करता तिचा डान्स पाहत आहेत. त्या व्हिडिओकडे पाहिल्यावर तो कदाचित उत्तर प्रदेशातील असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. शेतातील एका रस्त्यावर धावत येऊन त्या रस्त्याच्या मधोमध उभे राहून डान्स करत आहे. मुलीचा चेहरा दिसत नसला तरी तिनं मदर इंडियाच्या ज्या गाण्यावर डान्स केला आहे तो प्रभावी झाला आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Teacher Recruitment : 'राज्यात सरकारी-अनुदानित शाळांमध्ये तब्बल 18,500 नवीन शिक्षकांची भरती करणार'; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

Latest Maharashtra News Updates : सामान्यांची एकीची वीण उसवू नये- शरद पवार

उपमुख्यमंत्री शिंदेंनी कोणत्या अधिकाराखाली स्थगिती दिली? हायकोर्टाची विचारणा, बेकायदा इमारत प्रकरणी अडचणी वाढणार

Mahadevi Elephant : कोल्हापूरकरांच्या लढ्याला येणार यश? नांदणी मठाच्या 'महादेवी'साठी उच्चस्तरीय समिती घेणार निर्णय

Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार; ब्रह्मपुरी तालुक्यातील लाखापूर येथील घटना

SCROLL FOR NEXT