vinod bhanushali
vinod bhanushali  Team esakal
मनोरंजन

विनोद भानुशाली यांचा 'टी सीरिज'ला रामराम

युगंधर ताजणे

कोरोनाच्या संक्रमण काळात बॉलीवूडमध्ये (bollywood) मोठ्या प्रमाणावर बदल होताना दिसताहेत. पहिल्या तीन वर्षात 45 चित्रपटांशी जोडल्या गेलेल्या विनोद भानुशाली (vinod bhanushali) यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. टी सीरिज म्युझिक कंपन्यांशी जोडल्या गेलेल्या भानुशाली यांच्या नावाची मोठी चर्चा आहे. कबीर सिंग, बाटला हाऊस, साहो, थप्पड आणि तान्हाजी द अनसंग वॉरिअर सारख्या चित्रपटांशी भानुशाली हे जोडले गेले होते. त्यांच्या नावाला त्या क्षेत्रामध्ये मोठं वलय होतं. त्यांनी आता स्वतंत्रपणे व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आहे.

भानुशाली यांनी टी सीरिज सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी 27 वर्षांपूर्वी टी सीरिजचे संस्थापक गुलशन कुमार यांच्या सांगण्यावरुन टी सीरिजमध्ये ज्युनिअर लेव्हलवर काम करण्यास सुरुवात केली होती. मोठ्या संघर्षानं त्यांनी त्यांची वाट तयार केली. त्यामुळे ते प्रसिद्धही झाले. आता त्यांनी एक घेतलेल्या निर्णयामुळे ते चर्चेत आले आहे. विनोद यांनी ही कंपनी सोडेपर्यत ते अध्यक्ष झाले होते. त्यांनी ग्लोबल मीडिया, मार्केटींग, पब्लिशिंग आणि मीडिया एक्विझिशन सारख्या कामात भाग घेतला होता.

टी सीरिज सोडण्याचा विचार त्यांनी ऑगस्टमध्येच घेण्याचा विचार केला होता. 24 वर्षांपूर्वी त्यांनी ऑगस्टमध्येच ही कंपनी जॉईन केली होती. टी सीरिजला गुलशन कुमार यांच्या निधनानंतर मोठा झटका बसला होता. मात्र भानुशाली यांनी मोठ्या महप्रयासानं कंपनीला आकार देण्यात महत्वाची भूमिका बजावली. टी सीरिजनं त्यांना वेगळी ओळख दिली. त्यांनी ही कंपनी सोडण्याचं महत्वाचं कारण म्हणजे त्यांना स्वताची कंपनी सुरु करायची आहे.त्यासाठी त्यांनी टी सीरिजला रामराम केला आहे.

भानुशाली यांच्या या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला आहे. त्यामुळे बॉलीवूडलाही धक्का बसला आहे. मात्र या निर्णयाची तयारी ते गेल्या अनेक दिवसांपासून करत होते. हे फार कमी जणांना माहिती होते. आपली स्वताची कंपनी सुरु करण्याची त्यांची पहिल्या पासून इच्छा होती. आणि आता पूर्ण होत असल्यानं भानुशाली यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT