virajas kulkarni, mrunal kulkarni SAKAL
मनोरंजन

Virajas Kulkarni: पहिल्यांदाच आई सोबत काम करणार विराजस.. या मराठी सिनेमात माय - लेक एकत्र

विराजसने थेट आगामी सिनेमातला लूक शेयर करून सर्वांना एक सुखद धक्का दिला

Devendra Jadhav

Virajas Kulkarni News: माझा होशील ना फेम अभिनेता विराजस कुलकर्णी त्याच्या फॅन्सशी नेहमीच संवाद साधत असतो. विराजसने सोशल मीडियावर त्याच्या फॅन्सशी नुकताच एक प्रश्न - उत्तरांचं सेशन केलं.

यामध्ये विराजसने त्याच्या फॅन्ससोबत दिलखुलास संवाद साधला. एका फॅनने विराजसला त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल विचारलं. तेव्हा विराजसने थेट आगामी सिनेमातला लूक शेयर करून सर्वांना एक सुखद धक्का दिला.

(Virajas kulkarni will be seen upcoming historical marathi movie)

विराजसला त्याच्या फॅनने आगामी प्रोजेक्ट बद्दल विचारलं. तेव्हा विराजसने उलगडा केला कि तो सुभेदार सिनेमात महत्वाची भूमिका साकारणार आहे. या सिनेमात विराजसचे ४ वेगवेगळे लूक पाहायला मिळतील.

याशिवाय सुभेदार चं शूटिंग संपलं का? असा प्रश्न विराजसला एका फॅनने विचारला. त्यावेळी विराजसने थेट सिनेमातला त्याचा लूक व्हायरल करून माझं शूट संपलं असं त्याच्या फॅनला सांगितलं.

अशाप्रकारे विराजस आगामी सुभेदार सिनेमात अभिनय करतोय. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टकातील सुभेदार हा पाचवा सिनेमा आहे. गड आला पण सिंह गेला म्हणजेच तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमावर आधारीत हा सिनेमा आहे.

विराजसचे या सिनेमात ४ लूक आहेत, याचाच अर्थ विराजस बहिर्जी नाईक यांची भूमिका साकारणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे.

सुभेदार सिनेमात अभिनेत्री मृणाल कुलकर्णी या पुन्हा एकदा राजमाता जिजाऊसाहेबांची भूमिका साकारणार आहेत. त्यामुळे सुभेदार निमित्ताने विराजस पहिल्यांदाच आई मृणाल कुलकर्णी सोबत अभिनय करताना दिसणार असल्याची दाट शक्यता आहे. जून २०२३ ला सुभेदार सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

विराजसने काहीच दिवसांपूर्वी अभिनेत्री शिवानी रांगोळे सोबत लग्न केलंय. शिवानी सुद्धा झी मराठीवर तुला शिकवीन चांगलाच धडा या आगामी मालिकेत झळकणार आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP आंदोलनातील धरपकडीची संयुक्त राष्ट्रांकडून दखल; आंदोलकांना ताब्यात घेतल्याबद्दल चिंता व्यक्त, भारताचे प्रत्युत्तर!

Jayasri Burman Paintings : जयश्री बर्मन यांच्या चित्रांत पुराणकथा आणि निसर्गाचे अनोखे विश्व

Crime News: कड्यावरून ढकलून प्रेयसीचा केली हत्या;लग्न ठरल्यामुळे भेटण्यास टाळाटाळ केल्याने कृत्य

RICH ZODIAC SIGNS 2027: २०२७ मध्ये ‘या’ राशींचं नशीब चमकणार! मेहनतीला मिळेल भाग्याची साथ, अचानक होऊ शकतो मोठा धनलाभ

Maharashtra Weather Update : मॉन्सूनची महाराष्ट्रातून माघार, तापमानाचा पारा ३९ अंशांपार, ६ जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT