prakash raj in jai bhim 
मनोरंजन

'जय भीम' चित्रपटातील दृश्यावरून वाद; प्रकाश राज यांच्यावर होतेय टीका

या दृश्यामुळे अभिनेते प्रकाश राज यांना ट्रोल करण्यात येत असून सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

स्वाती वेमूल

'जय भीम' Jai Bhim हा चित्रपट नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला असून या चित्रपटातील एका दृश्यावर नेटकऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. या दृश्यामुळे अभिनेते प्रकाश राज Prakash Raj यांना ट्रोल करण्यात येत असून सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. चित्रपटातील दृश्यामध्ये हिंदीत संवाद साधल्यामुळे ते एका तमिळ व्यक्तीच्या कानशिलात लगावतात. याच दृश्यावर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 'जय भीम' या चित्रपटात प्रकाश आणि सूर्या यांच्या मुख्य भूमिका आहेत. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या दृश्यामुळे सोशल मीडियावर सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे.

टी. एस. गगानवेल यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून आदिवासी लोकांवर होणाऱ्या अन्यायाची कथा यामध्ये दाखवण्यात आली आहे. तमिळ भाषेतील हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. चित्रपटातील एका दृश्यामध्ये प्रकाश राज हे एका व्यक्तीच्या कानशिलात लगावतात. मला का मारलं, असा प्रश्न त्याने विचारला असता 'तू हिंदीत का बोललास, तमिळ भाषेत बोल' असं प्रकाश राज खडसावतात. खरं तर चित्रपटात या दृश्याची काही गरज नव्हती, असं मत अनेकांनी मांडलं आहे. तर काहींनी प्रकाश राज यांचीही बाजू घेतली आहे. 'हा चित्रपट हिंदी भाषिकांविरुद्ध नाही, दृश्यावर टीका करण्यासाठी संपूर्ण चित्रपट पहा', असं काहींनी म्हटलंय.

१९९३ मध्ये तमिळनाडूमध्ये घडलेल्या घटनेवर या चित्रपटाची कथा आधारित आहे. यामध्ये सुर्या, प्रकाश राज यांच्यासोबतच राजीशा विजयन, लिजोमोल होसे, राव रमेश आणि के मनिकंदन यांच्या भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Sarpanch News : सरपंचांचे अधिकार संपले?, फडणवीस सरकारचा निर्णय; मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांना अधिकार

प्रौढ बेपत्ता झाल्यास आता अपहरणाचा गुन्हा, नवी मुंबईत पहिली कारवाई; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी

Leopard Attack Junnar : औषध फवारणीचा पंप ठरला ढाल; बिबट्याच्या हल्ल्यातून शेतकरी दाम्पत्य थोडक्यात बचावले

Marathi News Live Updates : “एकनाथ शिंदे यांना मराठ्यांमध्येच मारामाऱ्या लावून दंगल घडवायची आहे", जरांगे यांचा गंभीर आरोप

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

SCROLL FOR NEXT