virat kohli anuhska sharma love story wedding anniversary SAKAL
मनोरंजन

Virat - Anushka Wedding Anniversary: एकमेकांच्या प्रेमात पडण्याआधी 'या' गोष्टीवरुन विराट - अनुष्कामध्ये झालेलं भांडण

विराट - अनुष्का या दोघांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे

Devendra Jadhav

Virat - Anushka Wedding Anniversary: विराट कोहली - अनुष्का शर्मा हे कायम चर्चेत असलेलं कपल. विराट - अनुष्का यांनी कायमच एकमेकांच्या करिअरमध्ये एकमेकांना सपोर्ट करताना दिसतात. नुकताच जो वर्ल्डकपचा थरार बघायला मिळाला, त्यावेळी प्रत्येक मॅचमध्ये अनुष्का विराटला सपोर्ट करताना दिसली.

विराट - अनुष्का कायमच आदर्श जोडपं म्हणून पाहायला मिळतं. पण एकमेकांच्या प्रेमात पडण्याआधी या दोघांचं जोरदार भांडण झालेलं. काय झालेलं नेमकं? आम्ही तुम्हाला सांगतो.

(virat kohli anuhska sharma love story)

या गोष्टीवरुन विराट - अनुष्कामध्ये झालेलं भांडण

अनुष्का आणि विराटची पहिली भेट खूपच वेगळी होती. विराटने स्वतः एका मुलाखतीत त्यांच्या पहिल्या भेटीचा उल्लेख केला आहे. विराटने सांगितले की, 2013 साली एका जाहिरातीच्या शूटच्या निमित्ताने दोघे भेटले होते. त्यावेळी विराट काहीसा घाबरला होता.

आणि या घाबरलेल्या अवस्थेत त्याने अनुष्काला तिच्या हिल्सबद्दल सांगितले की, तुला तुझे हिल्स फारच उंच नाही वाटत का?

हे ऐकून जे घडले अनुष्का विराटवर प्रचंड रागावली. पण हे भांडण फार काळ टिकू शकलं नाही. दोघांचं भांडण मिटून पुढे ते चांगले मित्र झाले.

या दिवशी विराट - अनुष्काचं प्रेम जगजाहीर

विराट - अनुष्का यांच्या पहिल्याच भेटीतल्या भांडणाचे रुपांतर पुढे मैत्रीत झाले आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात कधी झाले ते कळलेच नाही. 2014 मध्ये त्यांची लव्हस्टो जगासमोर आली जेव्हा विराटने मेलबर्नमध्ये शतक झळकावले आणि सामना पाहण्यासाठी आलेल्या अनुष्काला त्याने बॅट उंचावून 'फ्लाइंग किस' दिला. त्यानंतर दोघेही इव्हेंट - पार्टीमध्ये एकत्र स्पॉट झाले होते.

पुढे 11 डिसेंबर 2017 रोजी अनुष्का आणि विराटचे इटलीत लग्न झाले. ज्या रिसॉर्टमध्ये त्यांनी लग्न केले होते ते रिसॉर्ट फक्त या दोघांच्या लग्नासाठी डिसेंबरला ओपन झाले होते. फक्त ५० लोकांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला.

या लग्नात बाहेरून कोणी नव्हते, केवळ 50 लोकांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. पुढे त्यांनी मुंबईत मित्र - नातेवाईकांसाठी रिसेप्शनचे आयोजन केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Tourism Latest Update : गणपतीपुळे बीच अखेर पर्यटकांसाठी खुला! 2 महिन्यांनंतर बंदी उठवली; पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण

थकलेला चेहरा, चालताही येईना... नवऱ्याला अखेरचा निरोप देताना अरुणा इराणी यांना अश्रू अनावर; या कलाकारांचीही हजेरी

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

SCROLL FOR NEXT