virat anushka vamika 
मनोरंजन

विरुष्का वामिकासोबत पुण्यात; एअरपोर्टवरील फोटो, व्हिडीओ व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

पुणे - इंग्लंडचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर असून मंगळवारपासून एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. यातील पहिला सामना पुण्यात होणार असून सामन्यासाठी खेळाडू पुण्यात दाखल होत आहेत. भारताचा कर्णधार विराट कोहलीही पुण्यात आला आहे. पत्नी अनुष्का आणि मुलगी वामिकासुद्धा त्याच्यासोबत पुण्यात आले आहेत. वामिकाचा जन्म झाल्यानंतर ते विराट, अनुष्का आणि वामिका अहमदाबादला गेले होते. त्यानंतर आता ते पुण्याला येताना एअरपोर्टवरील त्यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. वामिकाचा जन्म झाल्यावर विराट आणि अनुष्काने वामिकाला मिडीयापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे तिचा चेहरा दिसू न देता विराट आणि अनुष्का वामिकाचे फोटो सोशल मीडियावर आतापर्यंत शेअर केले आहेत.

नुकतेच विरूष्का आणि वामिका विमानतळावर दिसले. यावेळी या कुंटुंबाचे परफेक्ट फॅमिली फोटो फोटोग्राफर्सने काढले. इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी अनुष्का विराट कोहलीसोबत अहमदाबादला गेली होती. अहमदाबादवरुन पुण्याला परतत असताना विरुष्काच्या कुटुंबाला एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं. यावेळी अनिष्काने वामिकाला कुशीत घेतले होते आणि विराटने सामान उचलले. वामिकाच्या जन्मानंतर अनुष्का पुर्णवेळ तिच्यासोबत घालवत होती. एरपोर्टवरील आनुष्का आणि विराटच्या फोटोला पाहून ते दोघ उत्तम पालक आहेत,असं सोशल मिडीयावर म्हटलं जातय. यावेळी अनुष्काने वामिकाचा चेहरा झाकला होता.

काही दिवसांपूर्वी विरुष्काने सोशल मिडीयावर एक फोटो शेअर केला होता. ज्यात घराच्या दारावरील पट्टीत वामिकाच नाव लिहीलेले दिसले. नुकतीच वामिका दोन महिन्यांची झाली. यावेळी विरूष्काने घरच्या घरीच या खास दिवसाचं जंगी सेलिब्रेशन केलं आहे.

अनुष्काने सोशल मीडियावर विमिकाच्या बर्थ डेच्या केकचा फोटो शेअर केला. हा फोटो वामिकाच्या वाढदिवसाच्या केकचा आहे. हा रेम्बॉकेकचा फोटो शेअर करून अनुष्काने, 'हॅप्पि 2 मन्थ टू ऑफ अस' असे लिहीले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतावर टॅरिफचा अमेरिकेचा निर्णय योग्यच, झेलेन्स्कींनी कारणही सांगितलं

धक्कादायक! चाकूचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार...कुटुंबीय गणपती विसर्जनाला गेले असता घडला प्रकार, गुन्हा दाखल

लफडं लपवण्यासाठी आईनंच घोटला पोटच्या 6 वर्षांच्या पोरीचा गळा; 17 वर्षीय प्रियकराच्या मदतीने मृतदेह फेकला विहिरीत

Latest Marathi News Updates : मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटीत दाखल

OBC Reservation: 'मराठा समाजाला ओबीसींच्‍या आरक्षणातून जागा देण्यास विरोध'; इस्लामपूरात पार पडली बैठक, अन्यथा तीव्र आंदोलन उभारणार

SCROLL FOR NEXT