Virat Kohli century Ranbir Kapoor want to play lead role esakal
मनोरंजन

Virat Kohli Biopic : विराट कोहलीच्या 'बायोपिक'मध्ये मला काम करायचंय! कोणत्या अभिनेत्यानं दर्शवली पसंती?

ज्या क्षणाची सारे भारतीय क्रिकेट चाहते आतुरतेनं वाट पाहत होते तो क्षण आला आणि वानखेडे स्टेडियमवरील असंख्य प्रेक्षकांनी तो डोळ्यात साठवला.

युगंधर ताजणे

Virat Kohli century Ranbir Kapoor want to play lead role : ज्या क्षणाची सारे भारतीय क्रिकेट चाहते आतुरतेनं वाट पाहत होते तो क्षण आला आणि वानखेडे स्टेडियमवरील असंख्य प्रेक्षकांनी तो डोळ्यात साठवला. भारताचा विक्रमी फलंदाज विराट कोहलीनं अखेर भारतीय क्रिकेटचा देव म्हणवल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या वन डे तील पन्नास शतकांचा विक्रम मोडीत काढला आहे.

विराटनं सचिनचं रेकॉर्ड ब्रेक केल्याचे दिसून आले आहे. यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रियांना उधाण आले आहे. लाखो चाहत्यांनी विराटचे कौतुक केले आहे. त्याला शुभेच्छा देत त्याचे अभिनंदन देखील केले आहे. अशावेळी एका बातमीनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ती म्हणजे विराटच्या बायोपिकची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

इतक्या लहान मुलांना फटाके वाजवायचे नसतात हे कसं समजवायचं?

बॉलीवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्यानं आपल्याला विराटच्या बायोपिकमध्ये काम करायला आवडेल असे सांगून लाखो चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. आपण दिसायला देखील विराट सारखेच आहोत त्यामुळे ही भूमिका आपल्याला करायला मिळेल. असाही विश्वास त्या अभिनेत्यानं व्यक्त केला आहे. तो अभिनेता दुसरा तिसरा कुणी नसून प्रख्यात अभिनेता रणबीर कपूर आहे. त्यानं दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली आहे. त्यामध्ये साऊथच्या अभिनेत्याचाही समावेश आहे. रणबीर कपूर, जॉन अब्राहम, कियारा अडवाणी, अनुष्का शर्मा, शाहिद कपूर, विकी कौशल या सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. दुसऱ्या इनिंगच्यावेळी देखील सेलिब्रेटी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

रणबीरनं भारतीय क्रिकेट टीमच्या प्रती आपलं समर्थन देत मला तर येत्या काळात कुणाच्या बायोपिकमध्ये काम करायला आवडेल असे विचारले तर मी विराटचं नाव घेईन. कारण मी त्याच्यासारखा दिसतो. म्हणून मी त्याच्या बायोपिकमध्ये काम करण्याचा विचार करतो आहे. अशी प्रतिक्रिया रणबीरनं यावेळी दिली आहे. त्याचीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

येत्या काळात मला तर संधी मिळाली तर मी नक्कीच विराटच्या बायोपिकमध्ये काम करेन असेही रणबीरनं म्हटले आहे. सध्या रणबीर हा त्याच्या अॅनिमल नावाच्या चित्रपटात व्यस्त असल्याचे दिसून आले आहे. त्यात प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Latest Maharashtra News Updates : शित्तूर -आरळा व चरण -सोंडोली पुलावर सुरक्षिततेसाठी कोकरूड पोलिसांनी लावले बॅरिकेट

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

Trapit Bansal: भारतीय तरुणाचा जगभरात डंका! IITian त्रपित बंसलला Meta कडून अब्जावधींची ऑफर; सॅलरी ऐकून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT