Virat kohli and Shahrukh Khan Video Viral Esakal
मनोरंजन

IPL 2023: भांडण मिटलं? पठाणच्या तालावर विराटचा जबरी डान्स! पाहून चाहते गार...Video Viral

Vaishali Patil

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चीच चर्चा सर्वत्र आहे. गुरुवारी शाहरुख खान त्याच्या टीम केकेआरला सपोर्ट करण्यासाठी ईडन गार्डन्सवर पोहोचला, जिथे त्याची मुलगी सुहाना खानही टीमला सपोर्ट करताना दिसली.

त्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 81 धावांनी पराभव केला. या सामन्यात कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना सात गडी गमावून 204 धावा केल्या. 

बॉलीवूडचा बादशाह अर्थात शाहरुख खानही या सामन्यात टीमला चिअर करण्यासाठी पोहोचला होता. सामना संपल्यानंतर बॉलिवूडचा बादशाह क्रिकेटचा बादशाह विराट कोहलीला भेटला. यानंतर दोघांनीही शाहरुखच्या पठाण, झूम जो पठाण या चित्रपटाच्या गाण्यावर जबरदस्त डान्स केला.

सामना संपल्यानंतर शाहरुख खान स्वतः विरोधी संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीला भेटायला पोहोचला. दोघांची भेट होताच शाहरुख खानच्या चित्रपटातील गाणे वाजू लागले. यानंतर कोहली आणि शाहरुखने डान्स करायला सुरुवात केली. यावेळी कोहलीच्या पायाला दुखापत झालेली होती तरीही त्याची चिंता न करता दोघेही बराच वेळ हसताना आणि डान्स करताना दिसले.

शाहरुख खान आणि विराट कोहली यांच्यातील फोटोंमध्ये खूप चांगली बाँडिंग पाहायला मिळाली. याआधीही दोघांना अनेक वेळा एकत्र पाहिले गेले आहे. शाहरुख खान फक्त विराटचाच नाही तर त्याची पत्नी अनुष्कासोबतही चांगला मित्र आहे.

त्याच झालं असं की गेल्या काही दिवसांपासून शाहरुख आणि विराटच्या चाहत्यांमध्ये वाद विवाद सुरु होते. दोघांचे चाहते ट्विटवर दोघांच्या विरोधात ट्विट करत होते आणि विराट आणि शाहरुखची तुलना करत होते.

त्यामुळे शाहरुख आणि विराटमध्ये काहीतरी बिनसलं आहे का अशी चर्चाही सुरु झाली होती मात्र आता शाहरुख आणि विराटचा ही मजामस्ती करतांनाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यांनतर त्याचे चाहते शांत बसले आहेत आणि दोघांच कौतुक करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6 Live Update: 'बिग बॉस मराठी ६' मध्ये आला अमरावतीचा बिल्डर

Raj Thackeray: पैसे फेकले की जनता विकत मिळते? ठाकरे बंधूंचा सरकारला थेट सवाल, राज ठाकरे म्हणाले- निवडणूक जिंकण्यासाठी...

बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी, शिल्पा शेट्टीच्या बहिणीला केलंय डेट ! मराठी बिग बॉसमध्ये कसा असणार राकेशचा अंदाज ?

भाजपनं केलं की अमर प्रेम, आम्ही केलं की लव्ह जिहाद का? काँग्रेस, एमआयएमशी युतीवरून ठाकरे बंधूंचा प्रहार

SCROLL FOR NEXT