who is that actress who's Virat Kohli die hard fan  esakal
मनोरंजन

Virat Kohliची जबरी फॅन आहे ही पाकिस्तानी ॲक्ट्रेस, काय आहे कारण?

विराटच्या या एका वक्तव्याने ही अभिनेत्री त्याची जबरी फॅन झाली आहे

सकाळ डिजिटल टीम

Virat Kohli Fan: विराट कोहली हा जगप्रसिद्ध क्रिकेटर असण्याबरोबरच तरूणींचा क्रश आहे. तरूणींबरोबरच पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री मथिराला देखील विराट कोहली फार आवडतो. पाकिस्तानची मोस्ट फेमस अभिनेत्री मथिरा ही तिच्या सिजलिंग अंदाजासाठी ओळखली जाते. ही अभिनेत्री विराट कोहलीची फार मोठी फॅन आहे. त्याचं कारणही तसंच आहे. (who is that actress who's Virat Kohli die hard fan)

विराटला का आवडते मथिरा?

मथिराने एक व्हिडिओ शेअर करत विराटचा कुठला अंदाज तिला सर्वात जास्त आवडतो याविषयी सांगितले आहे. खरं तर विराटने एका प्रेस कॉन्फरंसमध्ये एक वक्तव्य केलं होतं. ते वक्तव्य असं होत की, 'माझा देवावर विश्वास आहे, देवाला जेवढं द्यायचं असतं तेवढं आपल्याला मिळत असतं.' त्याच्या याच विचारांवर ही पाकिस्तानी अभिनेत्री फिदा झाली आहे.

मथिराने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केलाय. ज्यामध्ये विराट त्याच्या देवावरील श्रद्धेबाबत बोलताना दिसतो. त्याच्या या व्हिडिओला तिने म्हणून मी विराटची फॅन आहे असं कॅप्शन लिहिलंय.

गुरूवारच्या मॅचमध्ये जवळपास 1121 दिवसांनी विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय शतक ठोकले. आशिया कपमधील भारताच्या शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानविरूद्ध त्याने 61 चेंडूत नाबाद 122 धावा ठोकल्या. त्याने आपले 71 वे शतक पूर्ण करत अनेक विक्रमांना गवसणी घातली. विशेष म्हणजे विराट कोहलीचे हे टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटधील पहिलेच शतक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 LIVE : भाजप अन् शिंदे गट, शिवसेना यांच्यात थेट लढत...विदर्भ कुणाचा? निकालांबाबत उत्सुकता

Lionel Messi India Visit : लिओनेल मेस्सीच्या भारत दौऱ्याने फुटबॉलप्रेमींना दिली प्रेरणादायी ऊर्जा

Nagar Parishad-Nagar Panchayat Elections Result : मतदान झालं, निकाल लागतोय; पण नगरपंचायत-नगरपरिषद यात फरक तरी काय?

Suryakumar Yadav Cricket Stats : हे ‘सूर्यग्रहण’ सुटायला हवे!

साप्ताहिक राशिभविष्य : २१ डिसेंबर २०२५ ते २७ डिसेंबर २०२५

SCROLL FOR NEXT