Vishal Nikam, Winner of Big Boss Marathi 3 Colours Marathi
मनोरंजन

विशाल निकम ठरला 'बिग बॉस मराठी ३'चा महाविजेता

सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस

स्वाती वेमूल

बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 3) तिसऱ्या सिझनचा १०० दिवसांचा प्रवास अखेर संपला असून या सिझनचा विजेता प्रेक्षकांना मिळाला आहे. विशाल निकमने (Vishal Nikam) बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. (Winner of Big Boss Marathi 3) १५ सदस्यांसोबत या प्रवासाची सुरूवात झाली होती. त्यानंतर आदिश वैद्य आणि नीथा शेट्टी यांची वाईल्ड कार्ड एण्ट्री झाली. ग्रँड फिनालेपर्यंत फक्त पाच स्पर्धक पोहोचले. (Bigg boss marathi season 3 winner)

अंतिम फेरीत विशाल निकम, जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे, विकास पाटील आणि मीनल शहा या पाच स्पर्धकांमध्ये चुरस होती. (Bigg Boss Marathi Season 3 Contestants) त्यापैकी मीनल शहा आणि उत्कर्ष शिंदे सुरुवातीला बाद झाले. त्यानंतर विकास पाटीलला घरातून बाहेर पडावं लागलं. शेवटच्या टप्प्यात फक्त जय आणि विशाल घरात होते. त्यापैकी विशाल निकम विजयी ठरल्याचं मांजरेकरांनी जाहीर केलं. उपविजेताचा मान जय दुधाणे याने पटकावला. विजेत्याला बिग बॉसची ट्रॉफी आणि 20 लाख रुपयांचा धनादेश मिळाला. (Winner of Bigg Boss Marathi Season 3)

अगदी पहिल्या दिवसापासून विशाल निकमला तगडा स्पर्धक मानलं गेलं. विशालने बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्यापासूनच सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधलं होतं. 'तिकिट टू फिनाले'चं टास्क जिंकत विशालने ग्रँड फिनालेमध्ये आपलं स्थान पक्कं केलं होतं. मात्र इथपर्यंतचा त्याचा प्रवास अनेक चढउतारांचा होता. यामध्ये त्याला बिग बॉसकडून शिक्षासुद्धा भोगावी लागली आणि सर्वाधिक वेळा तो नॉमिनेशनच्या पिंजऱ्यात उभा होता. बिग बॉसच्या घरात १०० दिवस टिकून राहणार, असं वचन सूत्रसंचालक महेश मांजेरकरांना देऊन विशालने घरात पाऊल ठेवलं होतं. अखेर त्याने ते वचन पूर्ण केलं. (Big Boss Marathi 3 winner)

बिग बॉस मराठीच्या घरातील स्पर्धकांनी कार्यक्रम सुरु होताच प्रेक्षकांची मनं जिंकण्यास, त्यांच्या मनामध्ये एक विशेष स्थान मिळवण्यास सुरुवात केली होती. या १०० दिवसात हे सदस्य अनेक भावभावनांना, अनेक चढउतारांना सामोरे गेले. कधी त्यांच्या हसण्याने तर कधी त्यांच्या भांडणाने तर कधी त्यांच्या रडण्याने तर कधी त्यांच्यातील प्रेमाने तर कधी त्यांच्या मैत्रीने या चार भिंतींना, बिग बॉसच्या घराला घरपण आलं. अखेर हा प्रवास रविवारी संपला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL, Video: CSK विरुद्ध RCB चा सामना विराट कोहलीला सर्वात जास्त का आवडतो? म्हणाला, 'त्यांचे फॅन्स बंगळुरूत....'

Solapur : काँग्रेससह शरद पवारांना धक्का; भगीरथ भालके, अनिल सावंत शिवसेनेच्या वाटेवर; DyCM शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेशाची शक्यता

सत्ताधारी पक्षाचा नेता तरुणीसोबत नको त्या अवस्थेत; सापडताच कुठे पळू झालं? शेतातून....

Solapur Ambedkar Jayanti: बुद्धिजीवी भीमप्रेमींना साेलापूरात हवीय एकत्रित मिरवणूक; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव, मध्यवर्तीचा बुधवारी होणार निर्णय!

Latest Marathi News Live Update : टोलानी कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू, इतर विद्यार्थी आक्रमक; प्राचार्याच्या निलंबनाची मागणी

SCROLL FOR NEXT