Vivek Agnihotri calls Boycott Bollywood campaign ‘extremely good’, says it shows people’s frustration!  sakal
मनोरंजन

'बॉयकॉट बॉलीवुड' चांगलंच! विवेक अग्निहोत्रींची बॉलीवुडवर तीव्र नाराजी

'मी बॉलीवुडमध्ये येत नाही' म्हणत विवेक अग्निहोत्रींनी बॉलीवुडवर चांगलाच निशाणा साधला.

नीलेश अडसूळ

Vivek Agnihotri : काश्मिरी पंडितांवर झालेला अन्याय अत्याचार हा प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी द काश्मीर फाईल्सच्या निमित्तानं प्रेक्षकांसमोर आणला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 300 कोटींपेक्षा जास्त कमाई करुन लक्ष वेधून घेतले होते. या चित्रपटाला देशभरातून मोठ्या प्रमाणात संमिश्र स्वरुपाच्या (Social Media News) प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. मात्र बॉलीवुडकर या चित्रपटाविषयी फारसे बोलते झाले नाहीत. त्यामुळे सुरवाती पासूनच बॉलीवुड आणि विकेक अग्निहोत्री यांच्यामध्ये दरी निर्माण झालेली पाहायला मिळाली. नुकत्याच दिलेल्या या मुलाखतीत तर विवेक यांनी आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली. नव्हे तर बॉलीवुडला त्यांनी विरोधच दर्शवला. (Vivek Agnihotri calls Boycott Bollywood campaign ‘extremely good’, says it shows people’s frustration!)

गेल्या काही दिवसात बॉलीवुडमध्ये असलेलं गढूळ वातावरण सर्वांनाच ठाऊक आहे. 'बॉयकॉट बॉलीवुड'म्हणजेच बॉलीवुड चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याच्या या मोहिमेचा अनेक चित्रपटांना मोठा फटका बसला. बॉक्स ऑफिस वर बॉलीवुडचे कोट्यावधीचे नुकसान झाले. या सर्व प्रकारांमुळे बॉलीवुड चिंतेत असतानाच दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री मात्र या ट्रेंडचे समर्थन करताना दिसत आहे. नुकत्याच झालेल्या मुलाखतीत त्यांनी बॉलीवूड बाबत आपली नाराजी व्यक्त केली.

बॉयकॉट ट्रेंडवर बोलताना विवेक अग्निहोत्री म्हणाले की, 'हा मुद्दा थोडा किचकट आहे पण हा एक अतिशय चांगला ट्रेंड आहे. यातून प्रेक्षक आपली नाराजी व्यक्त करत असून, प्रेक्षकांना नेमकं काय हवंय हे समोर येत आहे. या ट्रेंडचा परिणाम शेवट खूप सकारात्मक असणार आहे. हे बॉलिवूडविरुद्धचे सांस्कृतिक बंड आहे. मात्र, माझा बॉलिवूडशी काहीही संबंध नाही. सध्या प्रचलित असलेले फॉर्म्युले वापरुन बॉलीवुड मध्ये जसे चित्रपट बनवले जातात. त्यातून बाहेर पडून वेगळे हिंदी चित्रपट बनवण्याचा माझा प्रयत्न असतो.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2400 crore loss: आयपीएलला प्रत्येक वर्षाला २४०० कोटींचा फटका बसतोय, पण कसा? मोदीने गणित समजावून सांगितलं

Arshdeep Singh Girlfriend: अर्शदीप सिंगची गर्लफ्रेंड आहे 'ही' अभिनेत्री? एका टॅटूमुळे समोर आलं मिस्ट्री गर्लचं रहस्य, Viral Post

‘लाडकी विद्यार्थिनी’ योजना रखडली, दीड हजार मुलींचे भवितव्य नावाच्या वादात

Latest Marathi News Live Update : जळगाव शेतकी संघाचा ‘भोंगळ’ कारभार : पोलीसांचा सौम्य लाठीचार्ज !

कतरिनाच्या गाण्यावर गौतमीचा भन्नाट डान्स, एन्ट्री स्टेप पाहून नेटकरी थक्क, Viral Video

SCROLL FOR NEXT