Vivek Agnihotri On Bollywood: 
मनोरंजन

Vivek Agnihotri On Bollywood : "बॉलिवूड मुर्ख कलाकारांनी भरलंय..." म्हणत विवेक अग्निहोत्रींनी बॉलिवूडला ठोकला रामराम

Vaishali Patil

Vivek Agnihotri On Bollywood: 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा काही वेगळा परिचय देण्याची गरज नाही. त्यांचे नाव नेहमीच चर्चेचा विषय असते. ते प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत स्पष्ट मत व्यक्त करतात. त्याच्या वक्तव्यामुळे अनेक वाद विवाददेखील होत असतात. अग्निहोत्री यांनी अनेकदा बॉलिवूडवर निशाणा साधला आहे.

बऱ्याच कलाकरांबद्दल ते सात्यत्याने बोलत असतात. आता पुन्हा एका मुलाखतीत त्यांनी बॉलिवूडवर निशाणा साधला आहे. बॉलीवूड कलाकारांना मूर्ख म्हणत आता ते अशा लोकांसोबत काम करु शकणार नसल्याने ते बॉलिवूडला रामराम ठोकणार असल्याचं त्यांनी या मुलाखतीत सांगितलं आहे.

एका पॉडकास्ट मुलाखतीत विवेक अग्निहोत्री म्हणाले की, "मी हे अहंकाराने बोलत नाही तर मी सत्य परिस्थीती सांगत आहे.

मला वाटू लागलं की मी ज्या कलाकारांसोबत काम करतोय ते शिकलेले नाहीत त्यांना जगात काय चाललयं याचे काहीच ज्ञान नाही. त्यांच्यापेक्षा मी जास्त हुशार आहे .

मला जगाबद्दलची समज त्यांच्यापेक्षा खूप जास्त आहे. त्यामुळे त्यांचा मूर्खपणा मला खाली खेचतो. ते इतके मूर्ख आहेत की त्यांच्यामुळे तुम्ही देखील खाली खेचले जातात."

"बॉलीवूड कलाकारांमुळे आज सिनेमा पूर्णपणे मंद झाला आहे. इथल्या कलाकरांमुळेच आज भारतीय सिनेमा इतका मूर्ख झाला आहे. हे कलाकार आपल्या दिग्दर्शक आणि लेखकांनाही मूर्ख बनवतात."

कमर्शियल सिनेमांना सोडण्याचे कारण सांगत विवेक म्हणाले की, "चित्रपट त्याच्यामुळे नाही तर नेहमीच चित्रपटातील मूर्ख अभिनेत्यामुळे ओळखला जातो. त्यामुळेच अग्निहोत्री यांनी मानसिकदृष्ट्या बॉलिवूडला राजीनामा दिला आहे

व्यावसायिक चित्रपटांमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या विवेक अग्निहोत्रीने चॉकलेट, धना धना गोल आणि हेट स्टोरी यांसारख्या हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

मात्र सध्या त्यान 'द ताश्कंद फाइल्स' आणि 'द कश्मीर फाइल्स' सारख्या चित्रपटांकडे मोर्चा वळवला आहे.

सध्या त्याचा 'द व्हॅक्सिन वॉर' हा सिनेमा रिलिजसाठी सज्ज आहे. त्याचबरोबर ते 'दिल्ली फाइल्स'मुळे देखील चर्चेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT