vivek agnihotri google
मनोरंजन

Vivek agnihotri : कोट्यावधींच्या कमाईनंतर विवेक अग्निहोत्रींची ही प्रतिक्रिया..

सध्या चर्चेत असलेल्या विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाने ३०० कोटींचा टप्पा पार केला आहे. या यशाबाबत विवेक अग्निहोत्री यांनी विचारले असता, त्यांनी पैशांपेक्षा माणसं जास्त महत्वाची असल्याचे विधान केले आहे.

नीलेश अडसूळ

The Kashmir Files: 'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटांवर सुरु असलेला वाद आता काहीसा मावळताना दिसतो आहे. परंतु या चित्रपटाचे वारे अजूनही थंडावलेले नाही. सोशल मीडियावर 'द काश्मीर फाईल्स'चा विषयी अजूनही बोलले जात आहे. या चित्रपटाला विशिष्ट वर्गाच्या विचारधारेकडून विरोध झाला असला तरी बॉक्स ऑफिस वर मात्र चित्रपट यशस्वी ठरला आहे. दिवसेंदिवस हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता वाढत असून प्रेक्षक चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहत आहेत.

या काही दिवसांपासून या चित्रपटाने स्वतःची एक वेगळीच प्रतिमा जनमानसात रुजवली. याशिवाय देशातील सांस्कृतिक आणि राजकीय वातावरण ढवळून काढले. काश्मिरी पंडितांवर झालेले अत्याचार इतक्या परखडपणे मांडल्याने अनेकांनी या चित्रपटावर आक्षेप घेतला. परंतु आम्ही घडलेली घटना, त्याचे सत्य लोकांपुढे आणले जे इतकी वर्षे लपवले गेले, अशी भूमिका विवेक अग्निहोत्री (vivek agnihotri) यांनी घेतली. काश्मीर मध्ये नेमके काय घडले असावे, याची उत्सुकता लोकांच्या मनात वाढत गेल्याने चित्रपटाला दिवसेंदिवस गर्दी वाढतच गेली.

या प्रकरणातून अनेक राजकीय वादही समोर आले. काहींनी या चित्रपटाला विरोध केला तर काहींनी पाठिंबा देत थेट चित्रपट करमुक्त करण्याची मागणी केली. सध्या भारतातील अनेक राज्यात हा चित्रपट आता करमुक्त करण्यात आला आहे. याचाही मोठा फायदा या चित्रपटाला झाला. सध्या या चित्रपटाने सगळे रेकॉर्ड मोडून ३०० कोटींचा टप्पा गाठला आहे.

या घवघवीत यशाविषयी विवेक अग्नीहोत्री यांचे पत्रकारांनी अभिनंदन केले. तसेच या यशाविषयी नेमकं काय वाटतं हे देखील त्यांना विचारले. त्यावर, 'पैसे महत्वाचे नाही. माणसं जोडणं महत्वाचं आहे. या चित्रपटाने माणसं जोडली' अशा शब्दात त्यांनी प्रतिक्रिया दिली. 'दिल जोडना जरूरी है' असे विवेक अग्निहोत्री यावेळी म्हणाले.

एसएस राजामौली (SS Rajamouli) दिग्दर्शित 'आरआरआर' (RRR) चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने 'द काश्मीर फाईल्सला'ही मागे टाकून ६०० कोटींचा टप्पा पार केला आहे. असे असले तरी अद्यापही प्रेक्षकांमध्ये 'द काश्मीर फाईल्स' पाहण्याची उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात उज्वल निकमांची एंट्री; विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Loan EMI Tips: कर्ज लवकर फेडण्यासाठी या 4 स्मार्ट टिप्स फॉलो करा! नवीन लोन घेताना 'या' 10 चुका अजिबात करू नका

Women Health: महिलांना चाळीशीनंतर सतत लघवीला का जावं लागतं? डॉक्टरांनी सांगितली त्यामागची खरी कारणं

Latest Marathi News Live Update : प्रियांका गांधींनी कुंभार समाजाच्या समस्यांबाबत आढावा बैठकीचे अध्यक्षपद भूषवले

Raigad Entrepreneurs Honoured: रायगडचा मान उंचावला; ‘नेक्स्टजेन डिजिटल’चे श्रीकांत जाधव व ‘अलोरवेदा’च्या पूजा खेडेकर यांना राष्ट्रीय ‘एमएसएमई स्टार पुरस्कार २०२६’

SCROLL FOR NEXT