Vivek agnihotri, Kangana Ranaut Google
मनोरंजन

कंगना विरुद्ध विवेक अग्निहोत्री वाद सुरु होण्याची चिन्ह; जाणून घ्या कारण

'द काश्मिर फाईल्स' चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी कंगना विरोधात मोठं वक्तव्य केलं आहे.

प्रणाली मोरे

'द काश्मिर फाईल्स'(The Kashmir FIles) सिनेमामुळे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. बॉलीवूडच्या टॉपमोस्ट दिग्दर्शकांमध्ये विवेक अग्निहोत्री हे नाव आता सामिल झालं आहे. बड्या स्टार्सना आता विवेक अग्निहोत्रींसोबत काम करायचं आहे अशी चर्चा आहे. काही कलाकारांनी तर म्हणे त्यांना थेट फोन करुन त्यांच्यासोबत काम करायची इच्छा देखील व्यक्त केली आहे. बातमी कानावर पडली होती की कंगना रनौत (Kangana Ranaut)आणि विवेक अग्निहोत्री(Vivek Agnihotri) लवकरच आगामी सिनेमाच्या निमित्तानं एकत्र काम करताना दिसणार आहेत. पण जाणून घेऊया काय म्हणालेयत यावर विवेक अग्निहोत्री.

विवेक अग्निहोत्री सध्या 'द काश्मिर फाईल्सच्या' निमित्तानं देशात सर्वत्र सिनेमाच्या प्रमोशनसाठी फिरताना दिसत आहेत. त्यानंतर 'द दिल्ली फाईल्स'च्या प्रदर्शनात ते व्यस्त असणार आहेत. त्यानंतर पुढे काय करायचं याचा विचार अद्याप केला नाही यासंदर्भात विवेक अग्निहोत्री यांनी मागे स्पष्ट केलं होतं. विवेक अग्निहोत्री यांना एका मुलाखतीत कंगना रनौतसोबत काम करण्याविषयी विचारलं असता त्यांनी स्पष्ट केलंय,''माझ्या सिनेमांना स्टार्सची गरज नाही,मला अॅक्टर्स हवे आहेत. मी १२ वर्षांपूर्वी सिनेइंडस्ट्रीत माझ्या करिअरला सुरुवात केली तेव्हाच मी ठरवलं होतं की मला टिपिकल बॉलीवूड स्टार-ड्राईव्हन सिनेमे बनवायचे नाहीत. मला माझ्या पद्धतीनं सिनेमाला ट्रिटमेंट द्यायचीय.मला लोकांना कथा सांगायची आहे,जी खरी असेल. सिनेमा हे लेखक आणि दिग्दर्शकाचं माध्यम आहे यावर माझा ठाम विश्वास आहे''.

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द काश्मिर फाईल्स' सिनेमानं आतापर्यंत तब्बल २५० कोटींचा बिझनेस केला आहे. सिनेमावर जेवढी टीका झाली तेवढंच लोकांनी डोक्यावरही उचलून घेतलं. नेहमी तिखट बोलणाऱ्या कंगनानेही सिनेमाचं कौतूक केलं होतं. पण आता विवेक अग्निहोत्रींनी कंगनासारख्या स्टार्सची नाही तर मला दर्जेदार कलाकारांची माझ्या सिनेमात गरज आहे असं म्हटल्यावर कंगना काय मुक्ताफळं उधळतेय याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Babasaheb Patil RBI action : सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवर RBIची कारवाई; नियमांचे उल्लंघन केल्याने जिल्हा बँकेच्या संचालकपदावरून बडतर्फ?

Western Ghats Biodiversity : सह्याद्रीच्या कुशीत दडलाय अमूल्य खजिना! आजरा परिसरात सापडल्या शेकडो दुर्मीळ औषधी वनस्पती; टाटा संस्थेकडून सर्वेक्षण

दुष्काळात कुणी खाईना का? ५०-६० रुपयांचे ड्रायफ्रूट्स, राईचा पर्वत करायची काय गरज? काजू-बदाम खाणाऱ्या खासदाराची प्रतिक्रिया

Latest Marathi News Update : गोकुळ निवडणुकीमध्ये भाजप सर्व 25 जागांवर उमेदवारी अर्ज भरणार

Asian Games: जपानमध्ये भारतीय नेमबाजांचे मोठे हाल! राही सरनोबतच्या हॉटेल बुकिंगबाबत घडला विचित्र प्रकार उघड

SCROLL FOR NEXT