Vivek Agnihotri Making Movie on Mahabharata esakal
मनोरंजन

Vivek Agnihotri Movie : 'महाभारता'वर तीन भागात करणार चित्रपट निर्मिती! 'कश्मिर फाईल्स' च्या दिग्दर्शकाची घोषणा

अशात अग्निहोत्री यांनी संस्कृत महाकाव्यावर चित्रपट तयार करणार असल्याच्या चर्चेला उधाण आले होते.

युगंधर ताजणे

Vivek Agnihotri Making Movie on Mahabharata : द काश्मीर फाईल्स, द व्हॅक्सिन वॉर सारख्या प्रसिद्ध चित्रपटांचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आता त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा केल्याच्या बातम्यांना उधाण आले आहे. अग्निहोत्री यांच्या इंस्टावरील त्या पोस्टनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. येत्या काळात महाभारतावर आधारित तीन भागांत चित्रपट बनविण्याचा निर्धार अग्निहोत्री यांनी व्यक्त केला आहे.

प्रसिद्ध अभिनेता प्रभास आणि क्रिती सेननच्या आदिपुरुषला नेटकऱ्यांकडून नकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर अनेक मेकर्सनं आगामी काळात ऐतिहासिक काळातील चित्रपट बनविण्याविषयी सावध भूमिका घेतली आहे. अशात अग्निहोत्री यांनी संस्कृत महाकाव्यावर चित्रपट तयार करणार असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. अग्निहोत्री यांचे म्हणणे आहे की, आपण या महाकाव्यावर चित्रपट केला तर त्याला प्रामाणिकपणे न्याय देणार.

Mahua Moitra : महुआ मोइत्रा यांच्यावरील कारवाई आणि वादांची मालिका

अग्निहोत्री यांनी याबाबत टाईम्स नाऊसोबत बातचीत केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, माझ्याकडे जेव्हा महाभारतावर आधारित चित्रपट बनविण्याचा प्रस्ताव आला तेव्हा मी खूपच विचारात पडलो. मी माझ्या आय़ुष्याचा बराचसा काळ हा वाचनात, अभ्यासात आणि संशोधनात घालवला आहे. मात्र महाभारताच्या कथेबाबत माझा दृष्टिकोन वेगळा आहे. असे त्यांचे म्हणणे आहे.

अग्निहोत्री यांनी म्हटले होते की, मला जर या अशा प्रकारच्या इतिहासाला समोर आणायचं असेल तर मी ते करणार. बाकीची लोकं बॉक्स ऑफिसवर दुसरं काही तयार करत आहेत. अशावेळी मी काही वेगळं करण्याचा प्रयत्न करतो आहे. अनेकांनी यापूर्वी अर्जुन, भीम यांचा महिमा कथन केला आहे. पण माझ्यासाठी महाभारत ही धर्म विरुद्ध अधर्माची लढाई आहे. असे त्यांनी म्हटले होते.

अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेयर करत लिहिले आहे की, मोठी घोषणा, महाभारत ही एक पौराणिक कथा आहे की इतिहास, आम्ही या विषयावर आता नव्या रुपात चित्रपट निर्मितीसाठी सज्ज आहोत. त्यासाठी डॉ.एस एल भैरप्पा यांचा मी खूप आभारी आहे. त्यांनी आधुनिक काळातील क्लासिक रचना म्हणावी अशी पर्व या ग्रंथाची निर्मिती केली आहे.

पद्रभुषण भैरप्पा यांना धन्यवाद. पर्व - अॅन एपिक टेल ऑफ धर्म....असे म्हणत अग्निहोत्री यांनी याचे आणखी एक कारण म्हणजे महाभारत हा सर्वकालीन श्रेष्ठ असा ग्रंथ आहे. असे म्हणत धर्म विरुद्ध अधर्म असा तो मोठा संघर्ष असल्याचे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna : मोठी बातमी ! प्रज्वल रेवण्णाला जन्मठेप; लैंगिक अत्याचार प्रकरणात विशेष न्यायालयाने सुनावली शिक्षा

भाड्याच्या घरात सापडलेला रवींद्र महाजनी यांचा मृतदेह; पत्नी- मुलासोबत का राहत नव्हते? हे होतं कारण

Georai News : मुंबईतील सीआयएसएफ मुख्यालयात जवानाने संपविले जीवन; धक्कादायक घटनेने गेवराईच्या तलवाड्यात शोककळा!

Astrological Prediction : उपराष्ट्रपती पदासाठी महाराष्ट्रातील नेत्याची निवड ते राज्य मंत्रिमंडळातील बदल; काय सांगत राजकीय भविष्य? वाचा...

Education News : शिक्षक नाहीत तर शाळा कशाला?"; आदिवासी पालकांचा संतप्त सवाल

SCROLL FOR NEXT