Vivek Agnigotri Video: Esakal
मनोरंजन

National Film Awards: करण जोहर पुरस्कार स्वीकारत असताना अग्नीहोत्रींना अचानक काय झालं? व्हिडिओ व्हायरल

Vaishali Patil

Vivek Agnigotri Video: 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे वितरण मंगळवारी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात करण्यात आले. चित्रपट जगतातील दिग्गज कलाकारांना यावेळी सन्मानित करण्यात आले आहे. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कलाकरांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्याला बॉलिवूडपासून ते साऊथ इंडस्ट्री आणि प्रादेशिक चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली.

यावेळी सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांच्या शेरशाह या चित्रपटाला विशेष ज्युरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी चित्रपट निर्माता करण जोहर याने हा पुरस्कार स्वीकारला.

आता सोशल मीडियावर करणचा पुरस्कार स्वीकारतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत करणच्या नावाची घोषणा होताच तो मंचाकडे जात असतो तेव्हा विवेक अग्निहोत्री यांनी केलेली कृती कॅमेऱ्यात कैद झाली.

यावेळी विवेक अग्नीहोत्रींच्या चेहऱ्यावरील हावभाव नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. यावेळी ते कुणाकडे तरी पाहून इशारे करताना दिसले. तर करण जोहर पारंपारिक पोशाखात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून पुरस्कार स्वीकारला. विवेक अग्निहोत्री यांना देखील 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटासाठी नर्गिस दत्त पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे

त्यानंतर अग्नीहोत्री यांनी एक्स वर(पूर्वीचे ट्विटर), 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते आणि भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासोबतचा एक फोटो शेयर केला ज्यात विवेक त्यांची पत्नी, अभिनेत्री पल्लवी जोशी, रणबीर कपूर, आलिया भट्ट, आर माधवन, वहिदा रहमान, एसएस राजामौली, अल्लू अर्जुन, क्रिती सेनन आणि श्रेया घोषाल यांच्यासह इतर कलाकार होते. मात्र, त्यांनी यातून करण जोहरचा फोटो फ्रेम मधून क्रॉप केला होता.

विवेक अग्नीहोत्री आणि करण जोहर यांच्यातील वाद हा सर्वश्रुत आहे. जरी ते दाखवत नसले तरी अनेक वेळा पोस्ट आणि वक्तव्यातून ते एकमेकांवर टीका करत असतात.

विवेक अग्निहोत्री यांना करण जोहरच्या चित्रपटांबाबतचा दृष्टिकोन आवडत नाही. एका मुलाखतीत त्यांनी करण जोहरवर भारतीय सिनेमाची संस्कृती बिघडवण्याचा आरोप देखील केला होता. त्याचबरोबर त्यांनी करणच्या चित्रपटाला नावंही ठेवली होती.

आता पुन्हा दोघांमधील वाद चर्चेत आला आहे. आता करण जोहर स्टेजवर जाताच विवेक अग्निहोत्रींनी केलेले विचित्र हावभाव असे सांगतात की करण जोहरला हा पुरस्कार देणं त्यांना अजिबात आवडलेलं नाही. अशा अनेक प्रतिक्रिया या व्हिडिओला नेटकरी करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT