Vivek Agnihotri To Team Up With 'Pushpa' Director For Next Project Google
मनोरंजन

Vivek Agnihotri: 'पुष्पा'च्या दिग्दर्शकासोबत अग्निहोत्रींचा नवा सिनेमा, ट्वीट करत म्हणाले...

अलीकडेच विवेकअग्निहोत्रींनी त्यांच्या सोशल मीडियावर 'पुष्पा'चे दिग्दर्शक सुकुमार यांच्यासोबत फोटो शेअर केल्यानं जोरदार चर्चा रंगली आहे.

प्रणाली मोरे

Vivek Agnihotri: 'द काश्मीर फाइल्स' आणि' द ताश्कंद फाइल्स' अशा ब्लॉकबस्टर चित्रपटांचे दिग्दर्शक, विवेक रंजन अग्निहोत्री यांनी आपल्या निर्भय आणि व्हिजनरी शैलीने चित्रपट निर्माण करून सर्वांना थक्क केले आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. तसेच, त्यांच्या कामगिरीमुळे प्रेक्षकांकडून त्यांना प्रशंसा मिळत असून, प्रेक्षक त्यांच्या आगामी चित्रपटांसाठी नेहमीच उत्सुक असतात.

अशातच, त्यांनी 'पुष्पा'चे दिग्दर्शक सुकुमार आणि 'द काश्मीर फाइल्स'चे निर्माते अभिषेक अग्रवाल यांच्याशी हातमिळवणी करून त्यांच्या आगामी मोठ्या प्रोजेक्टचे संकेत दिले आहेत.

हेही वाचा: भारतीय मंदिरे- धार्मिकतेबरोबरच सामाजिक अंगे जपणारी केंद्रे

अलीकडेच विवेक रंजन अग्निहोत्रीने त्यांच्या सोशल मीडियावर 'पुष्पा'चे दिग्दर्शक सुकुमार आणि 'द काश्मीर फाइल्स'चे निर्माते अभिषेक अग्रवाल यांच्यासोबत एक फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, “सिनेमातून भारताला एकत्र करुया . डिटेल्स लवकरच. गेस? सुकुमार (दिग्दर्शक, #पुष्पा) + अभिषेक अग्रवाल (निर्माता, #TheKashmirFiles) + योर्स ट्रूली (#TheKashmirFiles)"

तिन्ही लोकप्रिय सिनेनिर्माते एका प्रकल्पासाठी एकत्र आले आहेत हि संपूर्ण देशासाठी नक्कीच विशेष बाब आहे. जिथे विवेक रंजन अग्निहोत्री 'द ताश्कंद फाइल्स' आणि 'द काश्मीर फाइल्स'सारख्या दमदार चित्रपटांसाठी ओळखले जातात, तिथेच निर्माते अभिषेक अग्रवाल यांनी 'द काश्मीर फाइल्स' आणि 'कार्तिकेय 2' सारखे चित्रपट दिले आहेत. तसेच, सुकुमारने त्यांच्या ब्लॉकबस्टर 'पुष्पा: द राइज' चित्रपटाच्या माध्यमातून देशभरातील प्रेक्षकांची मने जिंकलीआहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''शेण कुणी खाल्लं हे संजय राऊतांना विचारा'', सुषमा अंधारेंच्या 'त्या' टीकेला काँग्रेसचं उत्तर...

Alephata News : शेतकरी पुत्राची कृषी अधिकारीपदी झेप; आळे येथील आदित्य तितरचे यश

Bhor Crime : भोरमध्ये दरमहा चार तरुणींचे पलायन; पोलिसांसमोर आव्हान, पाच वर्षांत आठ महिला बेपत्ता

IPL 2026 तोंडावर असताना जसप्रीत बुमराह बंगळुरूतील CoE मध्ये दाखल ! मुंबई इंडियन्सला धक्का बसणार?

माहेरी गेलेल्या पत्नीला एकटं गाठून पतीने केला जीवघेणा हल्ला, घरात रक्ताचा सडा; फरार पतीचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT