Vivek Oberoi Bollywood Actor share black truth esakal
मनोरंजन

Vivek Oberoi : 'मला मोठं होऊच दिलं नाही', प्रियंकानंतर विवेक ऑबेरॉयन सांगितलं बॉलीवूडमधलं सत्य!

विवेकनं देखील एका मुलाखतीमध्ये त्याला बॉलीवूडमध्ये आलेल्या वाईट अनुभवांविषयी त्यानं सांगितले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Vivek Oberoi bollywood Actor share black truth : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्रा जी आता हॉलीवूडची स्टार सेलिब्रेटी झाली आहे तिनं काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये तिच्या वाटेला बॉलीवूडमध्ये जो अपमान आला त्याविषयी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आता प्रख्यात अभिनेता विवेक ऑबेरॉयनं देखील त्याच्या बॉलीवूडच्या त्याच्या प्रवासाविषयी कटू अनुभव सांगितले आहे. त्यामुळे वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे.

विवेकनं देखील एका मुलाखतीमध्ये त्याला बॉलीवूडमध्ये आलेल्या वाईट अनुभवांविषयी त्यानं सांगितले आहे. यावेळी त्यानं उपस्थित प्रेक्षकांना वीस वर्षांपूर्वीच्या एका पत्रकार परिषदेविषयी सांगितले आहे. त्यावेळी सलमान खानकडून मला धमकी मिळाली होती. मी ऐश्वर्या सोबत रिलेशनशिपमध्ये होतो. त्यापूर्वी ऐश्वर्यानं सलमानला डेट केले होते.

Also Read - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Cureency करकक्षेत

विवेकनं हिंदूस्थान टाईम्सशी बोलताना सांगितले होते की, मला बॉलीवूडनं एका कोपऱ्यात टाकलं होतं. मला कुणी चित्रपट देत नव्हतं. चित्रपटात कुणीही घेत नव्हतं. एक वेळ तर अशी होती की, शुट आऊट एट लोखंडवाला लोकप्रिय झाल्यानंतर देखील दोन वर्षे कोणतीही ऑफर मला आली नाही. यावरुन त्या लोकांचा दबाव कसा होता हे लक्षात येईल. आता मी आनंदात आहे कारण मी खूप संघर्ष करुन स्वताची वेगळी वाट तयार केली आहे.

salman and vivek

नको तितक्या खोट्या गोष्टी माझ्याविषयी पसरविण्यात आल्या होत्या. माझ्याविरोधात एक लॉबी काम करत होती. ती माझ्याविषयी वाईट बातम्या पसरविण्याचे काम करत होती. मी काहीही करु शकत नव्हतो. जे लॉबिंग होतं ते प्रचंड ताकदवान होतं. मी एकटा त्याला काहीही करु शकत नव्हतो. त्यामुळे मी त्या गोष्टी खूप संयमानं घेतल्या. यातून मला खूप काही शिकायला मिळालं. बॉलीवूडमध्ये एक डार्क साईड आहे ज्याच्याविषयी फारसं कुणाला माहिती नाही.

मला जाणीवपूर्वक मोठं होऊ दिलं नाही. माझं करिअर संपवण्याचे प्रयत्न झाले. मला चित्रपट मिळू दिले नाही. माझे करिअर जोरदार होते तेव्हाच मला कुणीही चित्रपटामध्ये काम देत नव्हते. हेही आवर्जुन सांगावे लागेल. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री प्रियंका चोप्रानं तिच्या एका मुलाखतीमध्ये तिला बॉलीवूडमध्ये ज्या त्रासाला सामोरं जावं लागलं त्याविषयी खुलासा करुन खळबळ उडवून दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT