Vivek Oberoi Latest news esakal
मनोरंजन

Vivek Oberoi : 'जे सुशांतनं केलं तेच मी पण...' 'डार्क फेज' वरुन विवेकनं केला मोठा खुलासा

त्या मुलाखतीतून विवेकनं त्याच्या आयुष्यातील डार्क फेजविषयी परखडपणे सांगितलं आहे.

युगंधर ताजणे

Vivek Oberoi Comment : बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता विवेक ऑबेरॉय हा नेहमीच त्याच्या वेगळ्या स्टाईल आणि स्वॅगसाठी ओळखला जाणारा अभिनेता आहे. (Bollywood Latest news) सध्या तो त्याच्या एका प्रोजेक्टच्या निमित्तानं चर्चेत आला आहे. यावेळी त्यानं जे वक्तव्य केलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा लाईमलाईटमध्ये आला आहे.

यापूर्वी देखील विवेकनं त्याच्या वक्तव्यानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. (Vivek Oberoi News) बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयानं विवेकनं चाहत्यांची पसंती मिळवली आहे. त्याच्या साथिया, शूट अॅट लोखंडवाला, रक्तचरित्र सारख्या चित्रपटांना प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. यातच त्यानं काही वेबसीरिजमध्ये देखील काम केले (Bollywood Celebrity) होते. एका मुलाखतीमध्ये विवेकनं त्याचा बॉलीवूडचा प्रवास आणि त्या दरम्यान त्याल आलेल्या वाईट अनुभवांविषयी सांगितलं आहे.

त्या मुलाखतीतून विवेकनं डार्ड फेजविषयी भाष्य केलं आहे. तो म्हणतो कुणी काही का म्हणेना पण मी त्या दिवसांत एका वेगळ्याच परिस्थितीला सामोरा जात होतो. माझ्या आजुबाजूला सगळं काही नकारात्मक गोष्टींनी भरलं असताना मला त्यातून माझा मार्ग निवडायचा होता. त्यावेळी मीच माझ्या त्या मार्गातील प्रवासी आणि मार्गदर्शकाच्या भूमिकेत होतो. असेही विवेकनं म्हटलं आहे.

बऱ्याच जणांना माझा प्रवास हा फार सोपा वाटतो. प्रत्यक्षात तसे नाही. मी खूपच कष्टांचा सामना करुन आताच्या थांब्यापर्यत आलो आहे. ह्युमन्स ऑफ बॉम्बे सोबत त्यानं केलेल्या बातचीतमध्ये आपल्या मानसिक स्थितीविषयी भाष्य केलं आहे. तो म्हणतो, तुम्हाला त्या डार्क फेजमधून जावं लागतं. तुम्ही खूप निराशही होऊन जाता.

त्यावेळी जे सुशांतनं केले तेच माझ्याकडून झाले असते तर..मी देखील तसं काही करण्याचा निर्णय घेतला होता. जेव्हा तुमची पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ खराब होऊ लागते तेव्हा तुमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नसतो. अशावेळी मनात नकात्मकता येऊ लागते. असेही विवेकनं त्या मुलाखतीतून स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT