Vivek Sangle On his struggle, 'Bhagya Dile Tu Mala' actor Instagram
मनोरंजन

Vivek Sangle:खिशात पैसे नसल्यानं ऑडिशनलाही जाणं मुश्किल झालं होतं विवेक सांगळेचं; म्हणाला,'तो काळ..'

कलर्स मराठी वाहिनीवरील 'भाग्य दिले तू मला' या मालिकेतून विवेक सांगळेनं साकारलेली राजवर्धन ही भूमिका सध्या गाजतेय.

प्रणाली मोरे

Vivek Sangle:विवेक सांगळे मराठी मालिका विश्वातला प्रसिद्ध चेहरा. त्यानं अनेक मराठी सिनेमांतून मध्यवर्ती भूमिका साकारल्यानं आज महाराष्ट्रात घराघरात त्याला ओळखलं जातं. सध्या 'भाग्य दिले तृ मला' या मालिकेतून त्याची राजवर्धन ही भूमिका गाजतेय. त्याच्या सहज अभिनयानं त्यानं या मालिकेतूनही लोकांचे मन जिंकले आहे.(Vivek Sangle On his struggle, 'Bhagya Dile Tu Mala' actor)

विवेक सांगळेनं एका मुलाखतीत आपल्या करिअर विषयी बोलताना मनमोकळा संवाद साधला आहे. त्यानं आपल्या व्यावसायिक प्रवासाचा आलेख मांडताना अनेक आठवणींना उजाळा दिला आहे. काही आठवणी त्यानं शेअर केल्या ज्या त्याला आयुष्यातील खूप कठीण काळ दाखवणाऱ्या होत्या.

विवेक सांगळे आपल्या त्या कठीण काळाविषयी सांगताना म्हणाला, ''मला अजूनही आठवतं की २००९-२०१० मध्ये निर्माते काम मागायला गेल्यावर आम्हा कलाकारांचा बायोडेटा आणि फोटो मागून घ्यायचे. तेव्हा सोशल मीडिया आणि डिजिटलं मीडियाचं पीक नव्हतं,जेणेकरुन त्या माध्यमातून फोटो किंवा पोर्टफोलिओ त्यांना दिसेल. तेव्हा अनेक टी.व्ही मालिकांचे आणि सिनेमांचे शूट हे मढ आयलंडला असायचे. मला मढ पर्यंत प्रवास करावा लागायचा फक्त माझा बायोडेटा सबमिट करण्यासाठी''.

विवेक पुढे म्हणाला,''तेव्हा अनेकदा खिशात पैसे नसल्यामुळे मला ऑडिशनसाठी जाता यायचं नाही. मढमध्ये शूटिंगच्या लोकेशनपर्यंत पोहोचण्यासाठी जो प्रवास करायला लागायचा तेवढे पुरेसे पैसे माझ्या पाकिटात नसायचे. पण मला आनंद होतोय की खूप स्ट्रगल नंतर आज मी जिथे पोहोचलोय ते मला आनंद देणारं आहे. मी खूप स्ट्रगल केलंय आणि त्यानंतर यश चाखलं आहे. आणि असं झालं नसतं, मला सगळं सहज मिळालं असतं तर कदाचित मला यशाची किंमतच कळली नसती. माझ्या आयुष्यातील त्या कळीण काळानं मला खूप गोष्टी शिकवल्या''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Toll Hike April 1 : राष्ट्रीय महामार्गांवरील टोलदरात एप्रिलपासून वाढ; राज्यातील नऊ महामार्गांवर दरवाढीचा निर्णय, वाहनचालकांना किती मोजावे पैसे लागणार!

farmer Son Success Story: पळशीतील शेतकऱ्याचा मुलगा झाला कृषी अधिकारी; इच्छापूर्तीसाठी चिकाटीने केला अभ्यास, आई-वडिलांचे स्वप्न झालं पूर्ण!

Beed Fuel Shortage: आता पेट्रोल-डिझेल टंचाईच्या झळा; दोन दिवसांच्या सुट्या, वितरकांना कंपन्यांकडून क्रेडिट बंद; दिलासा मिळण्याची शक्यता

Kolhapur Illegal Gender Test : नाव श्रद्धा पण काम अंधश्रद्धा, उमलणाऱ्या कळ्या खोडणारा डॉक्टर; एजंट ताब्यात, सोनोग्राफी मशीन, गोळ्या जप्त

Pandharpur Vitthal Online Puja Booking : सावळ्या विठ्ठलाची पूजा करायचीय? 'या' तारखेपासून सुरू होतेय ऑनलाईन नोंदणी; जाणून घ्या सविस्तर नियम!

SCROLL FOR NEXT