Voice of India fame singer Mohammad Zakir Hussain passed away  sakal
मनोरंजन

Mohammad Zakir Hussain Death: 'व्हॉईस ऑफ इंडिया' फेम गायक मोहम्मद जाकिर हुसैन यांचे निधन..

हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले आहे.

नीलेश अडसूळ

Mohammad Zakir Hussain Death: 'व्हॉइस ऑफ इंडिया' फेम गायक मोहम्मद जाकिर हुसैन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेआहे. त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु रुग्णालयात पोहोचेपर्यंतच मात्र त्यांचा मृत्यू झाला होता.

छत्तीसगड मधील बिलासपुर येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. आज संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

(Voice of India fame singer Mohammad Zakir Hussain passed away )

मोहम्मद जाकिर हुसैन हे आपल्या कुटुंबासोबत ते छत्तीसगड मधील बिलासपुर येथे गेले होते. त्यावेळी त्यांची तब्येत अचानक खराब झाली. त्यांना हृदय विकाराचा झटका आला असल्याचे, माध्यमांनी दिलेल्या माहितीवरून समोर आले.

त्यांच्या निधनाची बातमी कळताच त्यांच्या धनवार येथील राहत्या घरी चाहत्यांनी गर्दी केली. त्यांच्या आवाजाचे इतके चाहते होते की हजारो लोक त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले. त्यांचे पार्थिव बिलासपुर वरुन छत्तीसगढ येथील कोरबा येथे आणण्यात आले आहे.

गायक मोहम्मद जाकिर हुसैन हे लहानपणापासूनच संगीत आणि कला क्षेत्रात होते. त्यांना गायनाची आधीपासूनच आवड होती. पण त्यांना खरी ओळख मिळाली ते 'व्हॉइस ऑफ इंडिया; या कार्यक्रमामुळे.

या कार्यक्रमामध्ये त्यांना संधी मिळाली आणि त्यांनी संधीचं सोनं केलं. आपल्या आवाजाने त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT