Salman Khan and Genelia D'Souza Instagram
मनोरंजन

जिनिलियासोबत सलमानचा भन्नाट डान्स; व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

स्वाती वेमूल

बॉलिवूडचा 'भाईजान' अर्थात अभिनेता सलमान खानने (Salman Khan) नुकताच आपला ५६वा वाढदिवस साजरा केला. पनवेलच्या फार्महाऊसवर वाढदिवसाची पार्टी करण्यात आली. यावेळी इंडस्ट्रीतील बरेच सेलिब्रिटी हजर होते. सोशल मीडियाद्वारेही अनेक कलाकारांनी सलमानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या सर्वात अभिनेत्री जिनिलिया डिसूझा (Genelia D'Souza) आणि सलमान यांच्या डान्सचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. सलमानच्या पनवेलमधल्या फार्महाऊसवरीलच हा व्हिडीओ असल्याचं म्हटलं जात आहे. जिनिलियाने सलमानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

या व्हिडीओमध्ये सलमान आणि जिनिलिया 'फूटलूज' या गाण्यावर नाचताना पहायला मिळत आहेत. अत्यंत उत्साहात हे दोघं डान्स करत आहेत. सलमानच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला बॉबी देओल, इब्राहिम अली खान, अरबाज खान, सलमानची एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानी आणि इतरही काही सेलिब्रिटी उपस्थित होते.

अभिनेत्री कतरिना कैफनेही सलमानसाठी खास पोस्ट लिहिली आहे. ''तुझ्या आयुष्यात आनंद आणि यश कायम राहू दे'', असं तिने लिहिलं आहे. कतरिनाने नुकतीच विकी कौशलशी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर कतरिना पहिल्यांदाच सलमानसाठी व्यक्त झाली आहे. त्यामुळे तिची ही पोस्ट चर्चेत आली होती. सलमान आणि कतरिना २०२२ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या 'टायगर ३' सिनेमात आपल्याला दिसणार आहेत. नुकतंच ते या सिनेमाचं एका शेड्युलंच शुटिंग पूर्ण करून मुंबईत परतले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pharmacy College Ban: राज्यात नवीन फार्मसी महाविद्यालयांना बंदी! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; कारण काय?

IPL 2026: श्रेयस अय्यरची स्पेशल सेंच्युरी! धोनी, रोहित, विराटच्या पंक्तीत मिळवलंय स्थान

'मी अनिल कपूरसारख्या माणसासोबत कधीच लग्न करणार नाही' असं का म्हणाली होती माधूरी?

विवाहित सतीश राजवाडेंसोबत जोडलं गेलेलं मुक्ता बर्वेचं नाव; पत्नीने दिलेली अशी प्रतिक्रिया, म्हणाली, 'मी स्वतः त्याला...'

Nursing Day Celebration: समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा

SCROLL FOR NEXT