rushi kapoor 
मनोरंजन

लग्नाच्या वरातीत नाचताना दिसतायेत ऋषी कपूर, इम्तियाज अली यांंनी शेअर केला व्हिडिओ

सकाळवृत्तसेवा

मुंबई- अभिनेता ऋषी कपूर यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टी अजुनही धक्क्यातून सावरलेली नाही. बॉलीवूडचे सेलिब्रिटी अजुनही त्यांच्या आठवणीच दुःख व्यक्त करत आहेत. सोशल मिडीयावर अजुनही त्यांना श्रद्धांजली वाहणं सुरुंच आहे. बॉलीवूडचे कलाकार त्यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींचा आधार घेत त्यांचं दुःख व्यक्त करताना दिसत आहेत. या साखळीत आता दिग्दर्शक इम्तियाज अलीने त्यांचा जुना व्हिडिओ पोस्ट केला आहे. 

इम्तियाज यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, ऋषी कपूर इम्तियाज अलीच्या भावाच्या लग्नात नाचताना दिसत आहेत. इम्तियाज अलीने हा व्हिडिओ पुन्हा एकदा पोस्ट करताना लिहिलंय, काश्मीरमध्ये आर.के यांचा हा व-हाडी नाच. सोशल मिडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ त्यांच्या दुस-या अकाऊंट वरुन शेअर केला गेला आहे. व्हिडिओमध्ये लग्नाची धावपळ दिसून येत आहे. या निमित्ताने अनेक पाहुणे गाणं गात आहेत. तर अभिनेते ऋषी कपूर मनसोक्त अंदाजात वरातीत नाचताना दिसत आहेत.

याआधी देखील इम्तियाज अलीने ऋषी कपूर यांच्या निधनावर एक मेसेज सादर केला होता. ज्यात त्याने ऋषी यांच्याविषयी सांगताना असं लिहिलं होतं की, भावाची वरात जेव्हा लग्नस्थळी दाखल होत होती तेव्हा ऋषी कपूर म्हणाले होते, तुम्ही सगळे पुढे जा मी शेवटी येईन. इम्तियाज यांनी लिहिलं होतं, मला नंतर समजलं की ऋषी कपूर यांना नव-याकडे असलेलं लोकांच लक्ष  त्यांच्याकडे वळवायचं नव्हतं. आज ते आपल्यात नाहीत. काही गोष्टी स्विकाराव्या लागतील मात्र हा काळ त्यांना विसरु देत नाहीये. मी जास्त वेळा त्यांना भेटलो नाही मात्र मला असं वाटतं की ते आजही हसत हसत आपल्यामध्ये आहेत. माझी अजुनही अशी इच्छा आहे की जास्त वेळ त्यांच्यासोबत घालवले असते त्यांच्यासोबत हसलो असतो. इम्तियाजने लव आज कल या सिनेमात ऋषी कपूर यांना दिग्दर्शित केलं होतं.  

watch video of rishi kapoor dancing imtiyaz ali posted  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Leaders Join Congress : ममता बॅनर्जींना मोठा धक्का! १०० हून अधिक नेते-कार्यकर्त्यांनी पक्ष सोडला; यावेळी भाजप नाही तर कॉंग्रेसमध्ये प्रवेश

आजचे राशिभविष्य - 29 सप्टेंबर 2026

आरोग्य‘चेतना’ : स्पायनल ट्युमरची अत्याधुनिक शस्त्रक्रिया

Maharashtra Weather : पावसाची पुन्हा एन्ट्री! राज्यातील ८ जिल्ह्यांना येलो अलर्ट; तुमच्या भागात कसे असेल हवामान ?

US-China Trade Deal : अमेरिका-चीन ट्रेड वॉरला ब्रेक! ६० अब्ज डॉलरच्या व्यापारावर मोठा निर्णय, भारताची चिंता वाढली ?

SCROLL FOR NEXT