Shriya Pilgaonkar first time to play a sex worker in comedy-drama Taaza Khabar Esakal
मनोरंजन

Taaza Khabar: सचिन पिळगावकरांच्या लेकीनं आलियालाही टाकलं मागे, वेश्येच्या भूमिकेत भाव खाऊन गेली श्रिया..

'ताजा खबर' या सीरिज मध्ये वेश्येची भूमिका आपण पहिल्यांदाच साकारत असल्यानं ती चॅलेंजिग वाटल्याचं श्रियानं एका मुलाखतीत म्हटलं आहे.

प्रणाली मोरे

Taaza Khabar: 'गिल्टी माइंडस्' आणि 'द ब्रोकन न्यूज' सारख्या सीरिजमधून दर्जेदार व्यक्तीरेखा साकाल्यानंतर श्रिया पिळगावकर आता डिस्ने + हॉट स्टारवर रिलीज होणाऱ्या आपल्या आगामी 'ताजा खबर' सीरिजमधून पुन्हा लोकांना आपल्या अभिनयाची जादू दाखवायला सज्ज झाली आहे.(Shriya Pilgaonkar first time to play a sex worker in comedy-drama Taaza Khabar)

श्रिया पिळगावकर 'ताजा खबर' या सीरिजमधून आधी कधीही न दिसलेल्या लूकमध्ये दिसणार आहे. या सीरिज मध्ये श्रिया पिळगावकरने वेश्येची भूमिका साकारली आहे. प्रेक्षकांनी मिर्झापूरमधील 'स्वीटी',गिल्टी माइंड्स मधील 'कशफ' आणि द ब्रोकन न्यूज मधील 'राधा' अशा भूमिकांमध्ये श्रियाला भलतंच पसंत केलं आहे,त्यामुळे आता 'ताजा खबर' मधील तिची वेश्येची भूमिका प्रेक्षकांना किती भावेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

हेही वाचा- संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

श्रिया पिळगावकर तिच्या या भूमिकेविषयी बोलली की,''ताजा खबर सारख्या सीरिजमध्ये मी आहे याचा मला खूप आनंद होतोय. या भूमिकेसाठी मी खूप उत्साही देखील आहे,कारण वेश्येची भूमिका मी पहिल्यांदाच साकारते आहे. हा अनुभव माझ्यासाठी खूपच नवीन होता. लोकांनी मला 'गिल्टी माइंड्स' मध्ये वकीलाची आणि 'द ब्रोकन न्यूज' मध्ये पत्रकाराच्या भूमिकेत पाहिलं आहे,त्यामुळे मी भूवन बाम सोबत कॉमेडी जॉनर असलेल्या 'ताजा खबर' या सीरिजमध्ये एका वेश्येची भूमिका साकारताना खूप एक्सायटेड होती. माझ्या लूक सोबत आणि परफॉर्मन्ससोबत प्रयोग करणं खूप मजेदार अनुभव होता. त्यामुळे आता लोक या माझ्या भूमिकेला कसं स्विकारतील हे जाणून घेण्यास मी खूप उत्सुक आहे''.

श्रियाला 'वेब सीरिज क्वीन' म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. तिनं आपल्या परफॉर्मन्सने नेहमीच चाहत्यांना नवं सरप्राईज दिलं आहे. 'ताजा खबर' मध्ये भुवन बाम,जे.डी चक्रवर्ती देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. लवकरच या सीरिजची रिलीज तारीख जाहीर केली जाईल. 'ताजा खबर' व्यतिरिक्त श्रिया आणखी दोन सिनेमातून महत्त्वाच्या व्यक्तिरेखा साकारताना दिसेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

Maharashtra GAIL Project: आता वाऱ्यापासून वीज तयार होणार! गेल महाराष्ट्रात मेगा प्रकल्प उभारणार; पवनऊर्जा विस्ताराला बूस्ट मिळणार

Ajit Pawar, DGCA Report आला समोर, आदिती तटकरे थेट बोलल्या...

Latest Marathi News Live Update : बर्ड फ्लूच्या खबरदारीमुळे संजय गांधी बायोलॉजिकल पार्क तात्पुरते बंद करण्यात आले

SCROLL FOR NEXT