मनोरंजन

आलिया भट आणि रणबीर कपूर केंव्हा अडकणार लग्नाच्या बेडीत? रणबीरने केला खुलासा

सुमित बागुल

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यंदा त्यांच्या रिलेशनशिपमुळे चांगलेच चर्चेत राहिलेत. दोघेही येत्या काळात आपल्याला ब्रह्मास्त्र सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

मात्र यावर्षी चर्चा रंगली ती म्हणजे रणबीर आणि आलियाच्या या दोघांच्या लग्नाची. दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे, हे त्यांनी अनेक रियालिटी शोमधून अनेकदा बोलून दाखवलंय. मात्र यंदा कोरोनामुळे या दोघांच्या लग्नात मात्र खोडा घातलाय.

एका प्रसिद्ध चित्रपट समीक्षकाराने नुकतीच रणबीर कपूरची मुलाखत घेतली. यामध्ये विविध विषयांवर चर्चा देखील झाली. मात्र, जेंव्हा लग्नाबद्दल रणबीरला विचारलं गेलं तेंव्हा रणबीर म्हणाला की, "यंदा कोरोनामुळे अनेक गोष्टी प्लॅनिंग नुसार होऊ शकल्या नाहीत. मात्र याबाबत आता अधिक वाच्यता करून गोष्टी आणखी वाईट करायच्या नाहीत. म्हणजेच कदाचित पुढल्या वर्षी, म्हणजेच 2021मध्ये आलिया आणि रणबीर लग्नाच्या बेडीत अडकू शकतात. 

लॉकडाऊन बाबत बोलताना आलियाबाबत रणबीर म्हणतो की... 

लॉकडाऊन बाबत बोलताना आलियाबाबत रणबीर म्हणतो की, "माझी गर्लफ्रेंड आलिया ही ओव्हर अचिव्हर आहे. तिने लॉकडाऊनमध्ये गिटारपासून स्क्रिन रायटिंग सर्व गोष्टी शिकून घेतल्यात. मला कायम आलिया समोर अंडर अचिव्हर असल्यासारखं वाटतं. मी लॉकडाऊनच्या काळात कोणताही क्लास लावला नाही. वर्षाच्या सुरवातीला आम्ही कौटुंबिक समस्यांशी दोन हात करत होतो. यानंतर मी अभ्यास करणे आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्यासारख्या गोष्टी सुरु केल्यात आणि मी दररोज दोन तीन सिनेमे पाहतो. 

wedding secret of alia bhatt and ranbir kapoor corona pandemic most awaited wedding

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

Mohol drought crisis: मोहोळ तालुका दुष्काळाच्या गडद छायेत; खरीप-रब्बी हंगाम उद्ध्वस्त, चारा टंचाईने शेतकरी आर्थिक कोंडीत

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT