Welcome 3 Film Release Date and Title Announcement  esakal
मनोरंजन

Welcome 3 : अक्षय काही थांबेना! OMG 2 नंतर 'वेलकम 3' ची घोषणा, रिलीज डेट आली समोर!

वेलकम नंतर त्याच्या दुसऱ्या भागानं मात्र प्रेक्षकांची निराशा केली होती. त्यात जॉन अब्राहम आणि श्रृती हसन यांच्या भूमिका होत्या.

युगंधर ताजणे

Welcome 3 Film Release Date and Title Announcement : बॉलीवूडमध्ये काही चित्रपटांना प्रेक्षकांची नेहमीच पसंती राहिली आहे. त्यात खिलाडीच्या वेलकम चित्रपटाचा उल्लेख करावा लागेल. हेरा फेरी सारखं यश या चित्रपटाला मिळाले होते. नाना पाटेकर, अनिल कपूर, परेश रावल यांच्यासारखे प्रसिद्ध अभिनेते या चित्रपटामद्ये होते.

नाना पाटेकर यांनी त्या चित्रपटात साकारलेली ती विनोदी भूमिका प्रचंड गाजली. सोशल मीडियावर तर त्याचे अजूनही कौतूक होते. त्याचे मीम्स तर नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. त्या चित्रपटाला प्रेक्षकांनी पसंती दिली होती. त्यात नानांच्या अभिनयाचे मोठ्या प्रमाणात कौतूकही झाले होते. नानांनी उदयसेठची भूमिका साकारली होती. तर अनिल कपूरनं मजनू भाईची साकारलेली भूमिका प्रेक्षकांची दाद मिळवून गेली.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

वेलकम नंतर त्याच्या दुसऱ्या भागानं मात्र प्रेक्षकांची निराशा केली होती. त्यात जॉन अब्राहम आणि श्रृती हसन यांच्या भूमिका होत्या. आता निर्मात्यांनी वेलकम ३ ची घोषणा केली आहे. त्याच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे. २०२४ च्या नाताळात हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तिसऱ्या भागामध्ये संजय दत्त आणि अर्शद वारसी यांच्या भूमिका असल्याची चर्चा आहे.

गेल्या काही दिवसांपासून वेलकम ३ ची चर्चा आहे. मात्र यात अक्षयची भूमिका महत्वाची ठरणार आहे. नुकताच अक्षयचा ओएमजी २ प्रदर्शित झाला आहे. त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. एका वेगळ्या विषयाची मांडणी या चित्रपटाच्या माध्यमातून अक्षयनं केली आहे. वेलकम ३ चे टायटल वेलकम टू द जंगल असे आहे. वेलकम च्या दोन्ही भागांचे दिग्दर्शन अनीस बज्मी यांनी केले होते. आता तिसऱ्या पार्टचे दिग्दर्शन अहमद खान यांनी केले आहे. त्याची निर्मिती साजिद नाडियावाला यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoffs Scenario: कोलकाताचे आव्हान संपुष्टात? गुजरात टायटन्सकडून दारूण पराभव, Point Table मध्ये मोठा बदल

GT vs KKR Live: शुभमन गिलची वादळी खेळी! विराट कोहलीकडून हिसकावली ऑरेंज कॅप; वैभव सूर्यवंशी टॉप फाईव्हमधून बाहेर गेला

AOR कोण आहेत, ज्यांना AI च्या वापराबाबत सरन्यायाधीशांकडून मिळाला इशारा; म्हणाले, विश्वास महत्त्वाचा!

Pune Police Bharti News: पोलिस भरती वैद्यकीय तपासणीत डमी उमेदवाराचा पर्दाफाश; ससून रुग्णालयातील प्रकारावर तिघींवर गुन्हा

Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक पडलं, पण संपलं नाही! आता मंजुरीसाठी सरकार कोणती रणनीती आखणार? ‘हे' ५ पर्याय गेमचेंजर ठरणार

SCROLL FOR NEXT