Welcome To The Jungle - Welcome 3 Akshay Kumar calls himself and Raveena 'puraane chawal' promo viral  SAKAL
मनोरंजन

Welcome 3: "पुराने चावलोसे कुछ सिखो!" तब्बल 19 वर्षांनंतर अक्षय -रवीनाची जोडी करणार प्रेक्षकांचं 'वेलकम'

Vaishali Patil

Akshay Kumar- Raveena Tandon in Welcome 3 Announcement: बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आज त्याच्या वाढदिवस साजरा करत आहे. अक्षयने त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना एक मोठं गिफ्ट दिल आहे. वाढदिवसानिमित्त त्यांने त्याच्या मोस्ट अवेटेड कॉमेडी फ्रँचायझी चित्रपट 'वेलकम 3' चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे.

'वेलकम' हा बॉलिवूडमधील टॉप कॉमेडी चित्रपट आहे ज्याच्या दोन्ही भागाला प्रेक्षकांनी खुप प्रेम दिलं आहे. आता पुन्हा अक्षय कॉमेडीचा डोस घेवुन आला आहे मात्र यावेळी त्याच्यासोबत पुर्ण बॉलिवूडची पलटणच आली आहे.

'वेलकम टू द जंगल' हे या चित्रपटाचे टायटल आहे. मात्र या चित्रपटात प्रेक्षकांना आणखी एक धमाका पहायला मिळणार आहे. तो म्हणजे या चित्रपटात अक्षय कुमार आणि रवीना टंडनची जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रवीना आणि अक्षय बऱ्याच काळानंतर एकमेकांसोबत स्क्रीन शेअर करताना चित्रपटाच्या प्रोमोत दिसत आहेत.

यापुर्वी रवीना आणि अक्षय कुमार यांनी मोहरा, मैं खिलाडी तू अनाडी, खिलाडियों का खिलाडी आणि बारूद या चित्रपटात एकत्र काम केले होते. तर दोघांचे टिप-टिप बरसा पानी हे गाणे ब्लॉकबस्टर हिट आहे.

दोघांनीही एकमेकांना बराच काळ डेट केले होते. मात्र काही काळानंतर दोघेही वेगळे झाले. त्यानंतर हे दोघेही पुन्हा कोणत्याच चित्रपटात एकत्र दिसले नाही.

मात्र आता चाहत्यांना या जोडीने सुखद धक्का दिला आहे. आता तब्बल 19 वर्षांनंतर पुन्हा एकदा ही जोडी 'वेलकम 3' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या व्यतिरिक्त चित्रपटात दिशा पटानी, जॅकलिन फर्नांडिस, परेश रावल, सुनील शेट्टी, जॉनी लीव्हर, कृष्णा अभिषेक, किकू शारदा यांसारख्या दिग्गज या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा पुढच्या वर्षी 20 डिसेंबरला ख्रिसमसला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral: विराट कोहली ४ महिन्यानंतर मायदेशात परतला; ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियासोबतच रवाना होणार

'ट्रेंड्सपेक्षा कंफर्ट महत्त्वाचा!' अभिनेत्री रिया जोशीचा लाँग स्कर्ट, सिल्व्हर ज्वेलरी आणि साडीतील खास स्टाईल फंडा

Diwali Travel Pune: दिवाळीच्या सुट्टीत फिरायला जायचंय? मग पुण्यातल्या 'या' सुंदर ठिकाणी जा आणि परदेशासारखा अनुभव घ्या!

सरन्यायाधीशांसमोर हजर करण्याचा बनाव, डिजिटल अरेस्ट करत नाशिकमध्ये २ वृद्धांची ७ कोटींची फसवणूक

गौतम गंभीरचे Rohit Sharma, विराट कोहली यांच्या भविष्याबाबत मोठं विधान! मोजक्या शब्दात बरंच काही बोलून गेला, चाहत्यांची वाढली चिंता

SCROLL FOR NEXT