deepika padukone  
मनोरंजन

दीपिका पादुकोणने अशी केली डिप्रेशनवर मात

आज दिपिका आपला ३५ वा वाढदिवस साजरा करत आहे

सकाळ डिजिटल टीम

२०१२ सालापासून ३ वर्ष ती डीप्रेशनचा सामना करत होती. २०१५ साली दीपिकाने प्रसारमाध्यमांसमोर नैराश्याशी कसा लढा दिला ते सांगितले.

आज दिपिका पादुकोण (Deepika Padukon)आपला ३५ वा वाढदिवस साजरा करत आहे. रणवीर सिंगबरोबर ती अतिशय आनंदात आयुष्य जगते आहे. तिचा गहराईया हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. मात्र, एकसोएक लोकप्रिय चित्रपट देणाऱ्या दिपिकालाही डिप्रेशनचा (Depression)सामना करावा लागला होता. त्यातून तीने शिताफिने बाहेर येत ग्रेसफेल आयुष्य जगण्याचा संकल्प केला. त्यामुळे डिप्रेशन आलं तर कशी मात करायची हे दिपिकाकडून बघणं गरजेचं आहे.

दिपीकाला डिप्रेशमुळे सर्व काही संपणार आहे असे तिला वाटत होते. तिने हार पत्करली होती, पण वडिलांचा प्रकाश पदुकोण यांचा सतत लढत राहण्याचा आदर्श तिने डोळ्यासमोर ठेवला. २०१२ सालापासून ३ वर्ष ती डीप्रेशनचा सामना करत होती. २०१५ साली दीपिकाने प्रसारमाध्यमांसमोर नैराश्याशी कसा लढा दिला ते सांगितले.

Deepika Padukone Family

आईचा सल्ला लाभदायक

दीपिकाने एका मुलाखतीत सांगितले होते की, तो माझ्यासाठी खूप वाईट अनुभव होता. जेव्हा मी त्या काळात होतो, तेव्हा माझ्या आईला माझ्यामध्ये नैराश्याची लक्षणे दिसली. तिने मला योग्य ट्रिटमेंट घेण्याचा सल्ला दिला. माझ्या आई आणि काउन्सिलरनेमला साथ दिली नसती तर मी इतक्या लवकर बरा झाले नसते, असेही दीपिका सांगते. जेव्हा तुम्हाला डिप्रेस वाटेल किंवा डिप्रेशनमध्ये चाललो आहोत असे वाटेल तेव्हा योग्य ट्रीटमेंट, मेडिटेशन आणि जवळच्या लोकांशी गोष्टी शेअर करणे विसरू नका, असा मोलाचा सल्ला दिपीका देते.

deepika

खेळामुळे बदलले आय़ुष्य

तुम्हाला एखादी गोष्ट चांगली करायला येत असेल तर तीचा आधार घ्या आणि झोकून द्या स्वत:ला. त्याचप्रमाणे दीपिकाकडे तिला येत असणारा बॅंडमिटन हा खेळ होता. तिच्या अंगातील या कौशल्याने तिला लढण्याची आणि हार न मानण्याची ताकद दिली. दिपीका सांगते, "जेव्हा मी मोठी होत होते, तेव्हा वडिलांनी मला सांगितले होते, "सर्वोत्तम होण्यासाठी, शिस्त, समर्पण आणि दृढनिश्चय (डिसीप्लिन, डेडिकेशन, डिटरमिनेशन) हे तीन 'डी' लक्षात ठेवा. आपल्या मनाचे एकून जे योग्य वाटेल ते कर. मीच हेच केले आणि डिप्रेशनमधून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करू लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT