Kangana Ranaut - Vikram Gokhale  Team eSakal
मनोरंजन

कंगना काय चुकीचं बोलली, माझ्याकडे पुरावे : विक्रम गोखले

माझी नाचक्की करण्याचा चंग...

प्रणाली मोरे

कंगना रणौतची (Kangana Ranaut) मुक्ताफळं नेहमीच तिला वादाच्या भोव-यात अडकवतात. आपल्या सिनेमांपेक्षा ती या वादांमुळेच चर्चेत राहते असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. काही दिवसांपूर्वी भारताला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947ला मिळालं नाही तर 2014ला मिळालं अशी बाष्कळ विधानं या बाईंनी उधळली होती. या कंगनाच्या विधानावर सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटी-राजकीय गोटातून सडकून टीका केली गेली. पण हा वाद इथेच थांबला तर तो वाद कसला, यात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी कंगनाच्या त्या विधानाचं समर्थन करीत नकळत स्वतःला या वादाच्या भोवऱ्यात लोटलं आणि लोकांचा रोष ओढवून घेतला.

विक्रम गोखले यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांना पत्रकारांनी कंगनाच्या या वादग्रस्त विधानासंदर्भात प्रश्न केला होता. त्यावेळेस विक्रम गोखले यांनी कंगनाच्या त्या विधानाचं समर्थन केलं होतं. मात्र त्यांनतर विक्रम गोखले यांनी कंगनाला दर्शविलेल्या समर्थनावर समाजातील विविध गोटातून तीव्र संताप व्यक्त केला जातोय.

विक्रम गोखले यांनी पाठवलेले पत्र.

आज विक्रम गोखले यांनी सकाळ डिजिटलशी बोलताना यासंदर्भात स्पष्टिकरण दिलं. ते म्हणाले,"मीडियानं माझी उगाच नाचक्की केली. स्वातंत्र्याचा इतिहास मला माहित आहे. माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत. पुराव्याशिवाय मी बोलत नाही. कंगना जे बोलली त्यात चुकीचं काय? माझ्याकडे पंडित नेहरुंच एक पत्र आहे. हे पत्र त्यांनी माऊंट बेटन यांना लिहीलं होतं. ते मी तुम्हाला देतो." विक्रम गोखले यांनी या पत्राची प्रत दिलेली असून, ही प्रत बातमीमध्ये जोडलेली आहे. सकाळ डिजिटलने स्वतंत्रपणे या पत्राची पुष्टी केलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपुरात एकाच कुटुंबातील ५ जण बेपत्ता, शेवटचं लोकेशन पुणे; १० दिवसांपासून शोध सुरू

Ketan Agrawal Case : पुण्यातील लोहगड केतन अग्रवाल प्रकरणानंतर 'राष्ट्रीय पुरुष आयोग' स्थापन होणार?, राज्यसभेत पडसाद; भाजप खासदारांकडून मागणी

Marathi Live Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये बुद्ध लेणी परिसरातील धबधबा पुन्हा प्रवाहित

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रासाठी पुढचे ७२ तास महत्वाचे, कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार; मुंबईसह अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट

MP Cabinet:अग्निवीरांना मोठी भेट! पोलीस भरतीत 20% आरक्षण, भोपाळ गॅस ट्रॅजडीच्या जागेवर उभे राहणार भव्य स्मारक

SCROLL FOR NEXT