Jaya Bachchan Birthday Esakal
मनोरंजन

Jaya Bachchan: रेप सीनमध्ये व्हिलनला फाडायचे होते जया यांचे कपडे.. पण दिग्दर्शकानं 'Action' बोलताच..वाचा भन्नाट किस्सा

जया बच्चन यांच्या ७५ व्या वाढदिवसा निमित्तानं त्यांच्या जुन्या मुलाखती व्हायरल होतायत. 'एक नजर' सिनेमातील हा किस्सा सांगताना त्यांना हसू आवरत नव्हतं.

प्रणाली मोरे

Jaya Bachchan: दिग्गज बॉलीवूड अभिनेत्री जया बच्चन त्यांच्या चिडचिड्या स्वभावामुळे नेहमीच चर्चेत असलेल्या पहायला मिळतात. शूटिंग सेटपासून ते संसदेपर्यंत जया बच्चन अॅग्रेसिव्ह अंदाजात दिसतात.

अमिताभ बच्चन यांची पत्नी जया बच्चन आज आपला ७५ वा वाढदिवस साजरा करत आहेत. जया बच्चन फिल्म इंडस्ट्रीत आल्यापासूनच स्टार अॅटिट्युडमध्ये राहिल्या आहेत. एकदा जया बच्चन यांचा रेप सीन शूट करायचा होता ज्यासाठी दिग्दर्शकानं व्हिलनला सांगितलं होतं की त्याला जया बच्चन यांचे कपडे फाडायचे आहेत.

राज्यसभा टी.व्ही सोबत बातचीत करताना जया बच्चन यांनी १९७२ सालच्या 'एक नजर' सिनेमाचा किस्सा सांगितला होता. सिनेमात सुधीर नावाचे अभिनेता जी व्यक्तिरेखा साकारत होते,त्या व्यक्तिरेखेला जया बच्चन यांचा रेप करताना दाखवायचं होतं. (When Jaya Bachchan beats villian so badly that he denied to do the rape scene with her )

जया बच्चन म्हणाल्या,''मला सांगितलं गेलं की तुमचे कपडे फाडले जातील''. मी म्हटलं,''नाही..मी बिलकुल यासाठी परवानगी देणार नाही. दिग्दर्शकासोबत माझं मोठं भांडण झालं''.

जया बच्चन म्हणाल्या की, दिग्दर्शक बी.आर. इशरानं त्यांना म्हटलं की ते हा सिनेमाच बंद करतील. तेव्हा जया बच्चन म्हणाल्या,''ठीक आहे..बंद करुया शूट''.

जया बच्चन पुढे म्हणाल्या,;;निर्मात्यानं सांगितलं तो आर्टिस्ट असोसिएशनकडे जाईल आणि मी म्हटलेलं,जे करायचंय ते करा''.

भांडणानंतर २ दिवस शूट पुढे ढकललं. तेव्हा अमिताभ बच्चननी त्यांना समजावलं की जेव्हा त्यांनी सिनेमासाठी हो म्हटलं आणि तेव्हा तो सीन स्क्रिप्ट मध्ये होता तर मग आता त्या नाही कसं म्हणू शकतात?

अमिताभ बच्चन देखील या सिनेमाचा भाग होते. जया बच्चन बिग बी यांना म्हणाल्या,''मी कोणालाही माझे कपडे फाडण्याची परवानगी देणार नाही. मी स्वतःचे कपडे स्क्रीनवर फाडताना पाहू शकत नाही''.

त्यानंतर दिग्दर्शक आणि जया बच्चन दरम्यान या गोष्टीवर एकमत झालं की त्या सीन मध्ये जया बच्चन यांना नॅच्युरल रिअॅक्शन द्यायच्या होत्या.

जया बच्चन म्हणाल्या,''बिचारा तो व्हिलन ज्याला माझा रेप करायचा होता,त्यानं माझ्याकडून इतका मार खाल्ला की तोच म्हणाला,मी हिचा रेप करणार नाही''.

जया बच्चन तो किस्सा सांगत खूप हसल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इन्स्टा, फेसबुकसाठी मोजावे लागणार पैसे, महिन्याला रिचार्ज; मेटाकडून सबस्क्रिप्शन मॉडेलची घोषणा, भारतात कसा आहे प्लॅन?

Vaibhav Sooryavanshi: 'नवा सिक्सर किंग...', गेलची आपलाच वर्ल्ड रेकॉर्ड मोडणाऱ्या वैभवसाठी स्पेशल पोस्ट; काय म्हणाला एकदा पाहाच

भेदक नजर आणि गूढ व्यक्तिमत्त्व ! घबाडकुंड सिनेमात शशांक शेंडे दिसणार मांत्रिकाच्या भूमिकेत

IT Park Land Transfer Kolhapur : आयटी पार्कची जागा ‘एमआयडीसी’च्या ताब्यात, औद्योगिक क्षेत्र करण्याची प्रक्रिया सुरू

पुणे, पिंपरी-चिंचवडसह नाशिकमध्ये CNG दरात वाढ, नवे दर आजपासून लागू

SCROLL FOR NEXT