Kareena Karisma Babita
Kareena Karisma Babita 
मनोरंजन

त्या काळात कपूर कुटुंबानेही फिरवली होती आईकडे पाठ; करीनाचा खुलासा

स्वाती वेमूल

अभिनेत्री करीना कपूर खान Kareena Kapoor Khan आणि तिची मोठी बहीण करिश्मा कपूर Karisma Kapoor यांचं संगोपन आई बबिता कपूर यांनी एकटीने केलं होतं. २००७ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत करीनाने सांगितलं होतं की, लहानाचं मोठं होताना ती आणि करिश्मा वडील रणधीर कपूर Randhir Kapoor यांना फार भेटले नव्हते. इतकंच काय तर कपूर कुटुंबीयांकडून बबिता यांना आर्थिक मदतही न मिळाल्याचं तिने सांगितलं होतं. (When Kareena Kapoor said Babita raised her and Karisma with no financial support from Kapoors)

रणधीर आणि बबिता यांनी ६ नोव्हेंबर १९७१ रोजी लग्न केलं. 'कल आज और कल' या करिअरमधील पहिल्यावहिल्या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र १९८८ मध्ये रणधीर कपूर हे पत्नी आणि मुलींपासून वेगळे आपल्या आई-वडिलांसोबत राहू लागले.

करिश्मा बॉलिवूडमध्ये स्टार होण्याआधी आर्थिक परिस्थिती कशी होती, याबद्दल करीनाने 'मुंबई मिरर'ला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं. 'आई सतत काही ना काही कामं करायची. तिने एकटीने आम्हाला लहानाचं मोठं केलं. रिअल इस्टेटचं काम होतंच पण त्याशिवाय ती इतरही लहानसहान कामं करायची. परिस्थिती फार कठीण होती. आम्हाला एकटं सोडलं होतं. लहान असताना आम्ही वडिलांना फार भेटू शकलो नव्हतो. पण आता आम्ही अनेकदा भेटतो, एक कुटुंब म्हणून वावरतो. '

रणधीर आणि बबिता हे वेगवेगळे राहत असले तरी त्या दोघांनी घटस्फोट कधीच घेतला नाही. बबिता, करीना आणि करिश्माच्या जवळ राहण्यासाटी मुंबईतील चेंबूर इथलं वडिलोपार्जित घर विकण्याचा विचार असल्याचं रणधीर यांनी नुकतंच सांगितलं होतं.

करीनाने सैफ अली खानशी लग्न केलं. या दोघांना चार वर्षांचा तैमुर हा मुलगा असून याच वर्षी फेब्रुवारीत करीनाने आणखी एका मुलाला जन्म दिला. दुसऱ्या मुलाचं नाव अद्याप करीना-सैफने जाहीर केलं नाही. करीना लवकरच आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटात झळकणार आहे. 'सिक्रेट सुपरस्टार' चित्रपटाचा दिग्दर्शक अद्वैत चंदनने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 'फॉरेस्ट गम्प' या हॉलिवूड चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता मसाल्यातही भेसळीची फोडणी! लाकडाचा भुसा, Acid चा वापर; १५ टन बनावट मसाला जप्त

Aavesham: 30 कोटींचं बजेट अन् कमाई 140 कोटी; ब्लॉकबस्टर ठरला फहाद फासिलचा आवेशम, ओटीटीवर कधी होणार रिलीज?

Karan Johar : "आई सोबत टीव्ही पाहत होतो पण.. " करण जोहर भडकला, कॉमेडीयनने मागितली माफी; कोण आहे केतन सिंह ?

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

SCROLL FOR NEXT