When Katrina Kaif Got Busy With Saaf Safai On The Sets Of Sooryavanshi 
मनोरंजन

अन् कतरिना चक्क कचरा काढू लागली, पाहा व्हिडीओ

वृत्तसंस्था

मुंबई : नव्या वर्षासह बॉलिवू़डमध्ये मनोरंजनाची चांगलीच मेजवानी प्रेक्षकांना मिळतेय. अऩेक चित्रपट या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. बॉलिवूडची एक आवडती जोडी म्हणजे अक्षय कुमार आणि कतरिना कैफ. या दोघांनी अनेक सुपरहिट सिनेमे एकत्र केले. आता ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यांचा 'सूर्यवंशी' हा सिनेमा येतोय. पण, या सिनेमाच्या सेटवर कतरिना कचरा काढताना दिसली. हा व्हिडीओ एकदा पाहाच ! 

कतरिना आणि अक्षय बऱ्याच दिवसांनी एकत्र दिसणार आहेत. "तिस मार खान'' हा सिनेमातून ते दोघं एकत्र दिसले होते. 'सूर्यवंशी' च्या निमित्ताने ही जोडी पुन्हा एकत्र दिसेल. तशी त्यांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री लोकांना पसंत आहेच. शिवाय ऑफस्क्रीनही अक्षय आणि कतरिना हे चांगले मित्र असल्याने एकमेकांसोबत मजा करताना दिसतात. त्याचाच प्रत्यय एका व्हिडीओमधून आला जो अक्षयने शेअर केला आहे. 

या व्हिडीओमध्ये कतरिना 'सूर्यवंशी' च्या सेटवर कचरा काढताना दिसतेय. ‘सूर्यवंशी’ हा रोहित शेट्टीचा कॉप युनिव्हर्समधील सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या सेटवर काही मजा-मस्ती सुरु आहे आणि त्याचा एक व्हिडीओ अक्षयने शेअर केला. कतरिना कचरा काढत असलेल्या या व्हिडीओला कॅप्शन देताना अक्षयने लिहिले, ''स्वच्छ भारत अभिनयासाठी नवा ब्रॅंड एम्बेसेडर मिळाला.'' असं मजेशीर कॅप्शन अक्षयने दिलं आहे. 

या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कतरिनाचं कौतुक केलं आहे तर काहींनी 'झाडूवाली बाई' अशी खोड काढली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने रोहित शेट्टी आणि अक्षय कुमार पहिल्यांदाच काम करताना दिसणार आहेत.  'सूर्यवंशी' येत्या 27 मार्चला चित्रपटगृहात दाखल होईल. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tilak Varma Injury: तिलक न्यूझीलंडविरुद्ध T20 सामन्यांतून बाहेर, वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Pune Election : शहरातील क्रीडा संकुल, शाळा-महाविद्यालयांत मतमोजणी केंद्रे तयार!

Maharashtra Police Foundation Day : "शहर सुरक्षेसाठी पोलिस, नागरिकांचा एकत्रित सहभाग महत्त्वाचा"- अमितेश कुमार!

Congress Manifesto: ‘पुणे फर्स्ट’चा नारा! पुण्यासाठी काँग्रेस काय करणार? जाहिरनाम्यात नेमकं काय?

Pune Traffic : "शहरात ‘कमी खर्चाचे’ वाहतूक व्यवस्थापन यशस्वी; कोंडी निम्म्याने कमी"- अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील!

SCROLL FOR NEXT