Padmini kolhapure Google
मनोरंजन

''मी त्याच्या कानाखाली मारतच गेले पण तो मात्र...''

अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांनी अनेक वर्षांनी मागितली 'या' अभिनेत्याची खुलेआम माफी

प्रणाली मोरे

वयाच्या सातव्या वर्षापासनं अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे(Padmini Kolhapure) हिंदी सिनेमात काम करतायत. राज कपूर(Raj Kapoor) यांच्या 'सत्यम शिवम सुंदरम' सिनेमात त्यांनी झीनत अमानच्या अगदी तरुणपणातली भूमिका साकारली होती. पण तिथेच राज कपूर यांनी त्यांच्यातील अभिनयाचे गुण हेरले आणि आपल्या १९८२ साली आलेल्या 'प्रेमरोग' सिनेमात पद्मिनी कोल्हापुरे यांना सिनेमातील मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी निवडलं. या सिनेमात काम करताना पद्मिनी कोल्हापुरे यांचं वय होतं अवघ सतरा वर्षांचं. पण यातला महत्वाचा भाग म्हणजे सिनेमात पद्मिनी यांनी साकारलेलं पात्र ही काहीसं त्याच वयाचं. या सिनेमात पद्मिनी यांनी विधवेची भूमिका साकारली होती.

या सिनेमात पद्मिनी यांच्यासोबत ऋषी कपूर(Rishi Kapoor) होते. एक श्रीमंत कुटुंबातील विधवा मुलगी आणि एका गरीब ब्राम्हण कुटुंबातला उच्चशिक्षित मुलगा,त्यांच्यातील मैत्री,खुलणारं प्रेम,समाजाची बंधनं असा सारा काही उत्तम मसालेदार ड्रामा 'शोमन' राज कपूर यांनी त्यांच्या नेहमीच्या स्टाईलने सिनेमात भरला होता. सिनेमातील गाणीही श्रवणीय. 'ये गलिया ये चौबारा,यहॉं आना ना दोबारा' हे गाणं तर आजही इतक्या वर्षांनी लग्नसमारंभात वाजवलं जातं हे विशेष. असो, हे सगळं सांगायचं कारण इतकंच की याच सिनेमामुळे पद्मिनी कोल्हापुरेंवर दिवंगत ऋषी कपूर यांची माफी मागायची पाळी आली.

Padmini Kolhapure And Rishi Kapoor in Prem rog

'प्रेमरोग' या सिनेमात एक सीन होता की जिथे पद्मिनी कोल्हापुरे यांना ऋषी कपूर यांच्या कानाखाली मारायची होती. पण त्या कानाखाली मारायला घाबरत होत्या. त्या राज कपूर यांना म्हणाल्या,''मी मारायची काय गरज आहे. फक्त मी अॅक्टिंग करते मारल्यासारखी,तुम्ही बाकी सगळं तांत्रिकदृष्टया करून घ्या''. पण शोमन राज कपूर यांना ते पटत नव्हतं. आणि चिंटू म्हणजे ऋषी पण सांगत होते की. ''तू बिनधास्त मार''. शेवटी राज कपूर पद्मिनी कोल्हापुरेंना म्हणाले,''तू जोरात मार,खरंखुरं मार,ज्याचा आवाज यायला हवा''. पण हा सीन कधी लाइट्समुळे,कधी तांत्रिक अडचणीमुळे अशा काही ना काही कारणामुळे परफेक्ट होत नव्हता. त्यामुळे तब्बल आठ वेळा ऋषी कपूर यांच्या कानाखाली मारल्यानंतर तो टेक ओके झाला. आणि चिंटू उर्फ ऋषी कपूर यांचे गाल तेव्हा लाल-लाल झाले होते. आज अनेक वर्षांनी एका मुलाखती दरम्यान पद्मिनी कोल्हापुरे यांनी हा किस्सा सांगितला. आणि लगेचच दिवंगत ऋषी कपूर यांची माफीही मागितली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, LSG vs GT: जॉस बटलर - शुभमन गिल बरसले, गुजरातचा सलग दुसरा विजय; रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का

Coal Rate: आता वीज बिल वाढणार नाही! कोल इंडियाचा मोठा निर्णय; उद्योग आणि ग्राहकांना मोठा दिलासा

Kagal Traffic Relief Project : पुणे -बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर अडीच किमीचा पिलर फ्लायओव्हर, कागल लक्ष्मी टेकडीचे ट्राफिक कायमचे होणार कमी

Breaking News Live Update: संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील एलओपी मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिले

Numerology : 'या' 3 मुलांकाच्या लोकांना नसतो सरकारी नोकरीचा योग; तयारीत घालवतात अनेक वर्षे, पण खाजगी क्षेत्रात मिळतं मोठं यश

SCROLL FOR NEXT