Salman Khan 
मनोरंजन

जेव्हा सलमान गर्लफ्रेंडच्या कपाटात लपला होता आणि एका चुकीमुळे पकडला गेला...

सकाळवृत्तसेवा

मुंबई- बॉलीवूडचा दबंग खान त्याच्या चांगल्या वाईट करामतींमुळे प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात राहतो. त्याचे चाहते तर त्याची केवळ एक झलक पाहण्यासाठी तरसत असतात. सलमानने पडद्यावर अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. आणि त्याची कोणतीही भूमिका असो चाहते त्याचा एक वेगळाच ट्रेंड व्हायरल करतात. सलमानच्या सिनेमांपेक्षाही जास्त चर्चा असते ती त्याच्या लग्नाची. इतकंच नाही तर त्याच्या वैयक्तिक जीवनाबद्दल जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते. सलमानने आत्तापर्यंत ऐश्वर्या राय, संगीता बीजलानी, सोमी अलीसोबत अनेकांना डेट केलं आहे आणि त्याच्या गर्लफ्रेंड्स-अफेअर्समुळे तर तो नेहमीच चर्चेत असतो.

सलमान खानने स्वतः एका शोमध्ये त्याच्या गर्लफ्रेंडसोबतच्या एका किस्स्याचा खुलासा केला होता. सलमानने सांगितलं होतं, 'तो एकदा त्याच्या गर्लफ्रेंडच्या कपाटात लपला होता. मात्र तो पकडला गेला.' सलमान खानने हा खुलासा त्यावेळी केला होता जेव्हा त्याच्या शोमध्ये राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर 'स्त्री' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी आले होते. त्यावेळी सलमानने सांगितलं की त्याच्या गर्लफ्रेंडचे वडिल अचानक घरी आले होते तेव्हा त्याला स्वतःला लपवणं भाग होतं. 

सलमान स्वतःला लपवण्यासाठी तिच्या कपाटात लपला मात्र एक चुक झाली आणि तो पकडला गेला.कपाटाच्या आत खुप धुळ असल्याने सलमान शिंका आली आणि मग सलमानच्या गर्लफ्रेंडच्या वडिलांनी त्याला पकडलं. मात्र तिच्या वडिलांना सलमान पसंत पडल्याने त्यांनी याविषयी काही हरकत घेतली नसल्याचं त्याने सांगितलं. 

लॉकडाऊनमुळे सलमान त्याच्या पनवेल येथील फार्महाऊसवर त्याच्या जवळच्या व्यक्तींसोबत आहे. इथे देखील त्याच्यासोबत अभिनेत्री जॅकलीन आणि युलिया वंतुर असल्याने त्याच्या गर्लफ्रेंडबाबतीतल्या चर्चां काही थांबत नाहीयेत.

when salman khan hide in his girlfriend closet because her father arrived home unexpectedly

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

पंखा लावण्यावरून वाद; महाराष्ट्रातील मोठ्या विद्यापीठात तरुणीचं विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य, पोलिसांवरही दबाव...

SCROLL FOR NEXT