When Sanjay Dutt Refused to share screen with Amitabh bachchan Google
मनोरंजन

Amitabh सोबत काम करायला जेव्हा संजय दत्तने दिलेला नकार, कारण ऐकाल तर...

अमिताभ बच्चन यांच्या सुपरहिट खुदा गवाह सिनेमात नागार्जुननं साकारलेली भूमिका आधी संजय दत्त करणार होता. पण अचानक त्याने सिनेमातून एक्झिट घेतली होती.

प्रणाली मोरे

2022 मधला बॉलीवूडमधला(Bollywood) आणखी कुठला सिनेमा चाहत्यांना लक्षात राहिला न राहिला सांगता यायचं नाही पण संजय दत्त(Sanjay dutt) मात्र लक्षात राहिला असणार हे नक्की. एप्रिल मध्ये केजीएफ चॅप्टर २ मध्ये अधिराची भूमिका निभवणाऱ्या संजय दत्तला पाहून सगळेच सुन्न झाले होते. आता-आतापर्यंत त्याच्या त्या सिनेमातील भयानक लूकची चर्चा रंगलेली होती. आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या शमशेरा सिनेमातील पोलिस अधिकारी शुद्ध सिंग बनून पुन्हा खतरनाक लूकमध्ये संजय दत्त दिसला अन् सगळे हैराण झाले.

संजय दत्तनं यावर्षी आपल्या चाहत्यांना दोन जबरदस्त सरप्राईज दिले आहेत. संजय दत्तने आतापर्यंत ज्या-ज्या भूमिका निवडल्या आहेत त्याला त्यानं पूर्ण न्याय दिलेला दिसून आलं आहे. संजयच्या करिअरकडे जर नीट पाहिलं तर लक्षात येईल की त्याने लीडचा हिरो साकारतानाच खलनायक बनण्याला, सहाय्यक अभिनेत्याची भूमिका करायलाही कमीपण समजलेला नाही.

सिनेमात दोन हिरो असोत की आणखी त्यापेक्षा अधिक असोत, संजयवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. पण तुम्हाला हे माहित आहे का, की त्यानं बॉलीवूडचे महानायक म्हणजे अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) यांच्यासोबत स्क्रीन शेअर करायला नकार दिला होता. आहे की नाही आश्चर्यकारक गोष्ट? चला जाणून घ्या, नेमकं घडलं काय होतं?

अमिताभ बच्चनचा सुपरहिट खुदा गवाह सिनेमा तर तुमच्या सगळ्यांच्याच लक्षात असेल. सिनेमात अमिताभ सोबत श्रीदेवी, नागार्जुन,शिल्पा शिरोडकर होते. या सिनेमात नागार्जुनने साकारलेली पोलिस ऑफिसरची भूमिका आधी संजय दत्त करणार होता. त्याला ही भूमिका फक्त ऑफरच झाली नव्हती,तर मुकुल आनंद दिग्दर्शित या सिनेमात त्याने काही सीनही शूट केले होते.

निर्माते मनोज देसाई यांनी सांगितले होते की, या सिनेमात संजय दत्तसोबत फराह नाज देखील होती, दोघांनी जे शूट केलं होतं ते ७ रिल्समध्ये केलं होतं. नंतर संजय दत्तने सिनेमा सोडल्यावर त्या रील्स फुकट गेल्या अन् नुकसानही झालं.

रिपोर्ट्सनुसार बोललं जात आहे की, मुकुल आनंद आणि अमिताभ बच्चन यांचा हम पाहिल्यानंतर संजय थोडा इनसिक्युअर होता. त्याला वाटलं की त्या सिनेमात अमिताभ बच्चनसमोर रजनीकांत,गोविंदाच्या भूमिकांना स्क्रीनवर खूप कमी वेळ दिला होता. त्यांच्या वाट्याला खूप कमी सीन दिले होते. त्यामुळे तो म्हणाला की, अमिताभ बच्चन आहेत तर माझ्या भूमिकेवर कोण लक्ष देणार

मात्र खुदा गवाह चे निर्माते मनोज देसाईंनी एकदा त्यांच्या मुलाखतीत सांगितले होते की, प्रत्यक्षात कारण वेगळंच होतं. संजय दत्तचा सिनेमा 'थानेदार' मधील गाणं 'तम्मा तम्मा' ज्या चालीवर संगीतबद्ध केलं गेलं होतं ती चाल खरंतर अमिताभ बच्चन यांच्या 'चुम्मा चुम्मा दे दे' गाण्यासाठी बनवली गेली होती. खरंतर याच्याशी संजयचे काही घेणेदेणे नव्हते,पण तो त्या सिनेमाचा हिरो होता आणि 'हम' चे दिग्दर्शकच 'खुदा गवाह' बनवत होते त्यामुळे त्याला सिनेमात काम करणं खटकत होतं. तो त्या गाण्याच्या बाबतीत जे काही घडलं त्यामुळे अस्वस्थ होता.

मनोज देसाई यांनी सांगितलं होतं की, संजय इतका त्या कारणानं अस्वस्थ होता की एकदा अमिताभ बच्चन यांच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाऊन सॉरी म्हणाला अन् त्यानंतर सिनेमाही सोडून निघून गेला. संजय दत्त आणि अमिताभ बच्चन यांनी त्यानंतर अनेक सिनेमांतून काम केलं. अलादीन, हम किसी से कम नही, दीवार, एकलव्य सारख्या सिनेमात दोघे एकत्र दिसले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

SCROLL FOR NEXT