When Shashi Kapoor ran after Shatrughan Sinha to hit him with a belt sakal
मनोरंजन

Shashi Kapoor Birthday: शत्रुघ्न सिन्हांना शशी कपूर पट्टयानं मारायला धावले होते.. हा किस्सा वाचाच..

आज शशी कपूर यांचा वाढदिवस..

नीलेश अडसूळ

Shashi Kapoor Birthday: दिववंग अभिनेते शशी कपूर यांचा आज वाढदिवस. बॉलीवुड मधील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक म्हणजे शशी कपूर. त्यांचे कित्येक चित्रपट आजही आवर्जून पाहिले जातात. एक काळ असा होता की ते त्या काळच्या तरुणांचे स्टाइल आयकॉन होते. अगदी अमिताभही शशीजींना फॉलो करत होते. 2017 साली त्यांचे निधन झाले, पण त्यांचे काम इतके मोठे आहे की आजही आपल्या सोबत असल्या सारखे वाटते. अशा शशी कपूर यांची एक खास बात आज जाणून घेऊया..

हा किस्सा आहे शशी कपूर आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण शशी कपूर हे शत्रुघ्न सिन्हा यांना मारण्यासाठी त्यांच्या मागे पट्टा घेऊन धावले होते. त्यावेळी शशी यांना शत्रुघ्न सिन्हा यांचा भयंकर राग आला होता. जाणून घेऊया नेमका काय आहे किस्सा..

(When Shashi Kapoor ran after Shatrughan Sinha to hit him with a belt)

शत्रुघ्न सिन्हा एका मुलाखतीत म्हणाले होते की, मला सेटवर पोहचण्यास नेहमी उशीर होत असे. त्यावरुन मला अनेक दिग्दर्शक, निर्माते यांचे बोलणे खावे लागले आहे. माझी ती सवय काही जाता जात नव्हती. त्यावेळी शत्रुघ्न यांच्या सह कलाकारांना तीन तीन तास वाट पाहावी लागत असे.
''एकदा काय झाले, आमच्या एका चित्रपटाचे चित्रिकरण सुरु होते. मला त्यावेळी सेटवर पोहचण्यास उशीर झाला होता. त्या चित्रपटात शशी कपूरही होते. तेव्हा शशी कपूर पट्टा घेऊन माझ्या पाठीमागे धावले. ते भयंकर चिडले होते.''

पुढे ते म्हणाले, ''त्याचे कारण असे की, मी उशीरा आलो होतो. मी शशी यांना म्हणालो, तुम्हाला वेळेची मर्यादा आहे म्हणून आणि मला माझ्यातील टँलेट पाहून या चित्रपटासाठी निवडण्यात आले आहे. त्यावर शशी कपूर मला म्हणाले, किती बेशरमपणे तु हे सांगतो आहेस. तुला लाज कशी वाटत नाही,'

त्यानंतर कित्येक दिवस शशी कपूर हे शत्रुघ्न यांच्यावर रंग धरून होते. पुढे हा राग निवळायला वेळ गेला पण नंतर शत्रुघ्न सिन्हा आणि शशी कपूर यांचे संबंध खूप प्रेमाचे झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Rate Today: सोन्याचा दर खाली, चांदीतही घसरण! तुमच्या शहरातील ताजे भाव तपासा

Latest Marathi News Updates : उदय सामंतांनी घेतली शरद पवार यांची भेट...

Airtel Recharge : एअरटेलचा पुन्हा धक्का! 'या' रिचार्ज प्लॅनचे दर झाले कमी, पण ग्राहक का नाराज? जाणून घ्या कारण

अरे हा काय टाइमपास लावलाय... तेजश्री- सुबोधच्या नव्या मालिकेवर प्रेक्षक नाराज; म्हणतात- एकही भाग पॉझिटिव्ह...

Kolhapur Flyover Project : कोल्हापुरात दोन उड्डाणपूल होणार, सायबर चौक, संभाजीनगर चौकात उभारणी शक्य, अमल महाडिक यांची माहिती

SCROLL FOR NEXT