Kangana Ranaut & Rohit Shetty Google
मनोरंजन

LockUpp: कंगनाच्या 'या' कैद्याचं नशीब फळफळलं;रोहित शेट्टीशी जोडलं जातंय नाव

कंगनाच्या शो मधील अनेक कैदी वादविवादांमुळे चर्चेत आहेत,त्यापैकी नेमका कोणत्या कैद्याला जॅकपॉट लागलाय याविषयी सगळ्यांच्याच मनात उत्सुकता आहे.

प्रणाली मोरे

प्रसिद्ध रिअॅलिटी शो 'खतरों के खिलाडी'(Khatron Ke Khiladi) च्या १२ व्या सीझनची जोरदार चर्चा सुरु आहे. या शो मध्ये रोहित शेट्टी(Rohit Shetty) आणखी भन्नाट काय काय स्टंट घेऊन यातोय याची देखील उत्सुकता शो पाहणाऱ्या चाहत्यांमध्ये दिसून येत आहे. पण याहून अधिक जास्त उत्सुकता आहे ती म्हणजे यंदा शो मध्ये कोणकोणते कंटेस्टंट्स दिसणार याविषयी. आतापर्यंत काही नावं समोर आली आहेत,पण त्यात एक महत्वाचं नाव समजलंय जे कंगनाच्या 'लॉकअप'(Lock Upp) शो सोबत जोडलं जात आहे. कंगनाच्या(Kangana) शो मध्ये सध्या सर्वात जास्त ज्याला प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे तो मुनव्वर फारुकी(Munawar Faruqui) कंगनाच्या जेलमधून बाहेर पडल्यावर रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी' मध्ये स्टंट करताना दिसणार आहे.

मीडियाला मिळालेल्या माहितीनुसार 'खतरों के खिलाडी सिझन १२' साठी मुनव्वर फारुकीचं नाव कन्फर्म झाल्याचं कळत आहे. मुनव्वर पहिल्यांदा वादामुळे चर्चेत होता,पण कंगनाच्या शो मध्ये आल्यानंतर त्याची इमेज खूप चांगल्या पद्धतीनं लोकांसमोर आली. शो मध्ये त्यानं ज्या पद्धतीनं स्वतःला लोकांसमोर ठेवलंय त्यामुळे त्यांच्या तो भलताच पसंतीस उतरलाय. शो मध्ये अंजली अरोरासोबतची त्याची मैत्री देखील सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच शो मध्ये त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी एक मोठा खुलासा झाला होता. एका फोटो ब्लर करुन दाखवण्यात आला होता,अन् त्याला त्याविषयी बोलण्यास सांगितले होते. तो तेव्हा त्याविषयी फार काही बोलला नव्हता. पण शेवटी समोर आलंच त्या फोटोचं रहस्य. फोटोमधील ती महिला आणि मुलगा म्हणजे त्याची बायको आणि त्याचा स्वतःचा मुलगा होता.

काहीही असो,शो मध्ये कितीही वाद मुनव्वर करत असेल किंवा मुनव्वरच्या लग्नाचं सत्यही समोर आलं असेल पण याचा फायदाच त्याला झाला म्हणायचा की. आणि इतका फायदा झाला की थेट जेलमधून बाहेर आल्यावर रोहित शेट्टीच्या क्लबमध्येच एन्ट्री. आता पहायचं 'खतरो के खिलाडी'शो मध्ये मुनव्वर स्टंटशी कसे दोन हात करुन रोहितसोबत प्रेक्षकांचाही फेव्हरेट खिलाडी बनतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : राज ठाकरेंचा मनसैनिकांना स्पष्ट अन् कडक आदेश; म्हणाले, ‘’मला विचारल्याशिवाय…’’

विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीचं सरन्यायाधीशांना साकडं; पत्र देऊन व्यक्त केली नाराजी...

Thane Politics: भाजपचे विकास म्हात्रेंचा युटर्न! वरिष्ठांनी मनधरणी करताच गैरसमज दूर

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Indian Railway: गणेशोत्सवाचे आरक्षण टप्प्याटप्प्याने सुरू करा, रेल्वेकडे प्रवासी संघटनांची मागणी

SCROLL FOR NEXT