Who is Deepraj who is being trolled because of the movie 'Ankush'?  Esakal
मनोरंजन

Ankush Movie Deepraj: 'अंकुश' चित्रपटामुळे ट्रोल होणारा दीपराज आहे तरी कोण?

Vaishali Patil

Ankush Movie Deepraj: गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर मराठी सिनेमांचं वर्चस्व दिसत आहे. बाईपण भारी देवा, वेड , महाराष्ट्र शाहिर, रावरंभा, 'सुभेदार'' असे अनेक सिनेमे लोकप्रिय झाले आहे. तर दुसरीकडे 'अंकुश' या चित्रपटाची चर्चा सुरु आहे.

'अंकुश' हा चित्रपट 6 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित करण्यात आला. मात्र चित्रपटाला प्रेक्षकांचा काही खास प्रतिसाद मिळाला नाही. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरल्याचं बोललं जात आहे.

हा सिनेमा तयार करण्यासाठी बक्कळ खर्च करण्यात आला होता. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांना आकर्षिक करु शकला नाही.

ओमकार फिल्म्स क्रिएशन्सच्या माध्यमातून राजाभाऊ आप्पाराव घुले यांनी 'अंकुश' चित्रपटाद्वारे चित्रपट निर्मितीमध्ये पदार्पण केले आहे. चित्रपटसृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसलेला दीपराजने या चित्रपटात अंकुश ची भुमिका साकारली आहे.

मात्र प्रेक्षकांना दीपराजचा अभिनय काहीसा खटकला आहे. अभिनय क्षेत्रात काम करण्याचा दीपराजचा हा पहिलाच अनुभव होता. या बिगबजेट अॅक्शन- थ्रीलरपटातून पदार्पण करणाऱ्या दिपराजसोबत केतकी माटेगावकर ही मुख्य भुमिकेत दिसली.

प्रेक्षकांना केतकीची भुमिका जितकी आकर्षक वाटली त्या तुलनेत दीपराजचा अभिनय काहीसा नापसंत करण्यात आला. त्यामुळे सोशल मीडियावर दिपराजच्या नावाची चर्चा सुरु झाली. इतकंच नाही तर अनेकांनी दीपराजला ट्रोल देखील केलं आहे.

दीपराजबद्दल बोलायचं झाल्यास त्याचे सध्या शिक्षण सुरू आहे. दीपराज हा सिव्हिल इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात आहे. तो इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे.

त्याचबरोबर दीपराजने अभिनय, नृत्याचे धडे गिरवले आहेत. त्याला किक बॉक्सिंगचेही ज्ञान आहे. अंकुश चित्रपटात मिळालेल्या संधीबद्दल तो स्वत:ला भाग्यवान समजतो.

‘अंकुश’ या चित्रपटाद्वारे राजाभाऊ घुले चित्रपट निर्मितीमध्ये पदार्पण केले आहेत. या चित्रपटाची कथा नामदेव मुरकुटे यांची असून, पटकथा व संवाद निशांत नाथाराम धापसे आणि नामदेव मुरकुटे तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटांचे लेखक-सहदिग्दर्शक निशांत नाथाराम धापसे यांनी चित्रपटाद्वारे दिग्दर्शकीय पदार्पण केले आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि केजीएफसारख्या चित्रपटांचे अॅक्शन दिग्दर्शक विक्रम मोर यांनी चित्रपटाचं अॅक्शन डिझाईन केलंय. याशिवाय गणेश आचार्य यांनी या चित्रपटातील गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे.

चित्रपटातील गाणी परदेशात चित्रित आली आहे आणि या चित्रपटाचं बजेटही तगडं आहे. मात्र इतक करुनही हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करु न शकल्याने आता या चित्रपटावर टीका होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

Daund Crime : पर्स स्टेशन जवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा; चोरानेच दिला सल्ला

Pune Crime : गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT